Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकरंजवण, पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग

करंजवण, पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग

ओझे | वार्ताहर Oze

- Advertisement -

दिंडोरी तालुयात परतीच्या पावसाने शनिवारी सांयकाळ पासून जोर धरल्यामुळे तालुयातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणचे पूल, रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. या परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यतानिर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.a

YouTube video player

तालुयात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तालुयातील करंजवण, वाघाड, पुणेगाव, ओझरखेड तसेच तीसगाव हे सर्व धरणे १००% भरल्यामुळे या धरणामधून हजारो यूसेक पाणी पाणी सोडण्यात आल्यामुळे कादवा, कोलवण तसेच उनंदा नदी काठावरील गावानां प्रशासनाकडून सतर्कतेचा देण्यात आला आहे. शनिवारी सांयकाळपासून दिंडोरीच्या पश्चिम भागात धुवांधार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्याना मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

पडणार्‍या पावसामुळे करंजवण धरणाच्या जलसाठयात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे धरणातून कादवा नदी पात्रात १९,९६० यूसेक पाणी कादवा नदीत सोडण्यात आले आहे. या सोडलेल्या पाण्यामुळे ओझे करंजवण कादवा नदीवरील पुल पाण्याखाली गेल्यामुळे संपूर्ण वाहतूक बंद आहे तर याच पूर पाण्यामुळे म्हेळूस्के ते लखमापूर पाण्याखाली गेल्यामुळे या दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे.

पुणेगाव धरणातून उनंदा नदीत ४,००० हजार यूसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून ओझरखेड धरणाच्या साडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. तालुयातील वाघाड, करंजवण, पुणेगाव, ओझरखेड या सर्व धरणातील पाणी पालखेड धरणात जमा होत असल्यामुळे पालखेड धरणातून ३६३५८ हजार यूसेक पाणी कादवा नदीत सोडण्यात आले आहे. धरणामधील पाण्याची आवक लक्षात घेता टप्याटप्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती करंजवण धरण शाखा अभियंता दंडगव्हाण, कार्यकारी अभियंता भागवत यांनी दिली.

सतर्क राहण्याचे आवाहन
दिंडोरी तालुयात शनिवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी, नाल्यानां पूर आला आहे. त्याचप्रमाणे धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असल्यामुळे नदीकाठावरील गावानां सतर्क राहण्याचे आदेश दिंडोरी पेठचे विभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे व तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...