Monday, July 1, 2024
Homeनगरसाचलेल्या पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू

साचलेल्या पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

कोपरगाव (Kopargav) शहरातील लक्ष्मीनगर भागात पाण्याच्या टाकीखाली साचलेल्या पाण्यात पडून एका तरुणाचा मृत्यू (Youth Death) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कलीम अब्दुल पठाण (वय 30 रा. लक्ष्मीनगर) असे मयत तरुणाचे नाव असून तो मोलमजुरीचे काम करत होता. या घटनेने कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

लक्ष्मीनगर भागातील पिण्याच्या पाण्याची गळती अनेक वर्षापासून थांबता थांबेना. पालिकेला अनेकदा निवेदन देऊन देखील पालिकेने पाण्याची गळती थांबवली नसून त्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष (Ignore) केल्या गेले आहे. पाण्याची रोज गळती होऊन हजारो लिटर पाणी टाकीच्या आवतीभवती साचून राहत आहे. त्यामुळे टाकीच्या बाजूला साचलेल्या पाण्यामुळे चिखल निर्माण झाला. मयत तरुण त्याच पाण्यात पडून मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या संदर्भात अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस प्रशासन (Kopargav Police) करत आहे. पाण्याच्या टाकीच्या परिसरात पालिकेची शाळा असून त्या ठिकाणी लहान मुले देखील खेळतात. अशा धोकादायक व दलदल युक्त ठिकाणी पालिका प्रशासनाकडून खबरदारी म्हणून अजून कुठलीही उपाय योजना केलेली नाही.

आज झालेल्या घटनेवरून स्थानिक नागरिकांकडून पालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गतवर्षी देखील पालिका प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारामुळे शहरातील उघड्या नाल्यात पडून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा ही दुसरी घटना समोर आल्याने पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अजून किती निष्पाप नागरिकांचा जीव जाणार, असा सवाल सुज्ञ नागरिक विचारत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या