Sunday, June 2, 2024
Homeनगरपाण्याची मोटार चोरताना दोघे रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन

पाण्याची मोटार चोरताना दोघे रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहर हद्दीत कॉलेज रोड परिसरात 13 ऑक्टोबर रोजी दुपारच्या दरम्यान दोन भामटे 5 हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटर चोरुन नेत असताना काही तरुणांनी त्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

- Advertisement -

विलास तबाजी तनपुरे (वय 45) रा. मल्हारवाडी रोड हे शहर हद्दीत राहुरी कॉलेज रोडवर डेअरी चालवतात. डेअरीवर पाणी शुध्द करण्यासाठी एटीपी प्लॉन्ट वर इलेक्ट्रीक मोटर आहे. दुपारच्या दरम्यान दोन अनोळखी इसम 5 हजार रुपये किंमतीची एटीपी प्लॉन्टवरील इलेक्ट्रीक मोटर चोरुन घेवुन जात होते. त्यावेळी डेअरीचे व्यवस्थापक संजय जब्बुकर व डेअरीवरील कर्मचार्‍यांनी दोन्ही भामट्यांना रंगेहाथ पकडले. संजय जब्बुकर यांनी सदर घटनेची माहिती विलास तनपुरे यांना फोन करुन सांगीतली.

विलास तनपुरे हे ताबडतोब त्या ठिकाणी गेले. तेव्हा भामट्यांना पकडून ठेवलेले होते. याबाबत राहुरी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपींकडे हातोडी, टॉमी व पान्हे मिळून आले. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे सांगुन तिसर्‍या एका आरोपीने चोरी करण्यास सांगीतले अशी माहिती दिली. विलास तबाजी तनपुरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्या फिर्यादीवरून राहुल अजीत देशमुख, भाऊराव बापुसाहेब भोंगळ व योगेश खंडागळे, तिघे रा. टाकळीमिया, यांच्यावर भादंवि कलम 379, 511 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या