कळवण । प्रतिनिधी Kalwan
अर्जुनसागर धरणातून 1700 क्यूसेक पाणी विसर्ग करण्यात येत असल्याने तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याची पातळी वाढली असून पुनद खोरे परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे धरणात हजारो क्यूसेक पाणी वाढण्याचे शक्यता आहे. धरणामधील आवक बघून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. पुनद व गिरणा नदीकाठच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कळवण हवामान खात्याने काल दुपारी पावसाची संततधार चालू असल्याने धरणपात्रात कुणीही जाऊ नये, असे आवाहन केले आहे. नदीकाठलगतच्या लोकांनी कुणीही बेसावध राहू नये अर्जुनसागर धरणातून 1700 क्यूसेस विसर्ग असल्यामुळे धरण परिसरातील नागरिकांनी आपली पशु-धन यांची काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी केले आहे.
पुनद धरण चीजवस्तू, शेतीमोटर पंप सुरक्षित असून कोणतीही जीवित हानी होऊ नये अशी सुचना तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे कळवण तालुक्यातील धरणसाठ्यात वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे दोन तीन दिवसात मुसळधार पाऊस झाला तर काही धरणे भरण्याच्या मार्गावर येणार आहे.





