Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्यानांदूरमध्यमेश्वरमधून ३६ हजार क्युसेसचा विसर्ग; 'पाहा' कुठल्या धरणांतून सोडले किती पाणी

नांदूरमध्यमेश्वरमधून ३६ हजार क्युसेसचा विसर्ग; ‘पाहा’ कुठल्या धरणांतून सोडले किती पाणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरासह जिल्ह्याभरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची (Rain) संततधार सुरु आहे. कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसात असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे…

- Advertisement -

सततच्या पावसाने नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. गंगापूर धरणातून ४ हजार ८१५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. होळकर पुलाखालून ७ हजार ८३० क्युसेसने पाणी सुरु आहे.

नाशकात बोगस प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश

दारणा धरणातून १० हजार ५६२ क्युसेसने विसर्ग सुरु आहे. मुकणे धरणातून १ हजार ८९ तर कादवा धरणातून ५ हजार १ क्युसेसचा विसर्ग होत आहे. वालदेवी धरणातून ४०७ क्युसेस तर आळंदी धरणातून ४४६ क्युसेसने पाणी सुरु आहे.

टोल भरण्यावरून दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ…

नांदूरमध्यमेश्वर धरणातून ३६ हजार ७३१ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पालखेडमधून ५ हजार ९६४ क्युसेसचा विसर्ग तर भोजपूर धरणातून ९९० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सतत सुरु राहिल्यास धरणांमधून टप्याटप्याने विसर्ग वाढवण्यात येईल. नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सोशल मिडिया अकाऊंट हॅक

- Advertisment -

ताज्या बातम्या