Friday, May 3, 2024
Homeक्रीडाजि. प. विरुद्ध अटीतटीच्या सामन्यात जलसंपदा विभागाची बाजी

जि. प. विरुद्ध अटीतटीच्या सामन्यात जलसंपदा विभागाची बाजी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा परिषद (Zilla Parishad) विरूध्द जलसंपदा विभाग (Water Resources Department) या दोन संघांमध्ये झालेल्या क्रिकेटच्या (Cricket) सामन्यात अटीतटीच्या लढतीत जलसंपदा विभागाने बाजी मारली…

- Advertisement -

नाणेफेक जिंकून जलसंपदा विभागाने प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारली. जिल्हा परिषदेकडून नितीन पाटील व सुभाष अहिरे यांनी खेळण्यास सुरुवात करून देत चांगली फलंदाजी केली. मधल्या फळीत फलंदाज प्रमोद निरगुडे, बोराडे रावसाहेब, हमीद शेख, विजय कानडे यांनी मैदानात उतरून टोलेबाजी केली.

जि. प. क्रिकेट संघाचे कर्णधार अभियंता रावसाहेब पाटील यांनी नेटाने एक बाजू लावून धरली. परंतु, रणरेट अतिशय वाढल्यामुळे जिल्हा परिषद संघाला सामना गमवावा लागला. गोलंदाज बच्छाव, पवन पवार, प्रदिप अहिरे यांनी गोलंदाजीत प्राविण्य दाखविले.

सामन्याचा आनंद लुटण्यासाठी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता प्रवीण गायकवाड, समिर रकटे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या