काठमांडू/जळगाव ।
उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश तसेच नेपाळला गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील ११० भाविकांच्या एका बसला नेपाळमध्ये अपघात झाला असून बस नदीत कोसळल्याने 27 भाविकांचा यात मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत पर्यंत 27 जणांचे मृतदेह सापडले आहेत.सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला. तेथून जाणार्या लोकांनी बस नदीत कोसळल्याचे पाहिले आणि पोलिसांना कळवले. ही बस उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील धरमशाला मार्केटमधील सौरभ केसरवानी यांच्या पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
110 भाविकांनी 15 ऑगस्टला वरणगाव येथून प्रयागराजसाठी रेल्वेने प्रवास सुरु केला.त्यांनी अयोध्या,काशी येथे दर्शन घेवून ते नेपाळकडे रवाना झाले. दि.22 रोजी त्यांनी पोखरा येथून पुढे जाण्यासाठी प्रवास सुरु केला. सुमारे 43 भाविकांना घेऊन पोखरा येथून काठमांडूला जात असताना या बसला अपघात झाला आणि ती नदीत कोसळली.प्रयागराज येथून तीन बसमधून हे प्रवासी नेपाळमध्ये गेले होते. हे प्रवासी भुसावळ परिसरातील असल्याचे बस मधील जखमी प्रसवाश्यांने सांगितले.तीन बसपैकी एक बस घसरून अपघातग्रस्त झााली आणि पृथ्वीराज मार्गावरील दमौली मुगलिंग रोड खंड मार्स्यांगदी नदीत कोसळली. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलेला असल्याने अपघाताची तीव्रता वाढली. तसेच अपघातग्रस्त बसमधील काही प्रवासी हे वाहून गेले असण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
मृतांची नावे
- सुधाकर बळीराम जावळे,2. रोहिणी सुधाकर जावळे3. सुहास प्रभाकर राणे 4. सरला सुहास राणे5. नीलिमा सुनील धांडे6. तुळशीराम तायडे7. मंगला विलास राणे8. सागर कडू जावळे9. भारती प्रकाश जावळे10. संदीप राजाराम सरोदे11. पल्लवी सरादे12. गणेश पांडुरंग भारंबे13. सुलभा पांडुरंग भारंबे14. मिनल गणेश भारंबे15. परी गणेश भारंबे16. नीलिमा चंद्रकांत जावळे17. पंकज भगवान भारंबे18. अनिता अविनाश पाटील19. अनुप सरोदे20. सरला तायडे21. सुमन वारके22. रुपाली हेमराज सरोदे23. गोकर्णी संदीप सरोदे24. साधना सुहास राणे25. सरोज मनोज भिरुड26. मुर्तूजा खान (चालक)27. एक बेपत्ता1. सुधाकर बळीराम जावळे2. रोहिणी सुधाकर जावळे3. सुहास प्रभाकर राणे4. सरला सुहास राणे5. नीलिमा सुनील धांडे6. तुळशीराम तायडे7. मंगला विलास राणे8. सागर कडू जावळ9. भारती प्रकाश जावळे10. संदीप राजाराम सरादे 1. पल्लवी सरादे 12. गणेश पांडुरंग भारंबे13. सुलभा पांडुरंग भारंबे14. मिनल गणेश भारंबे15. परी गणेश भारंबे16. नीलिमा चंद्रकांत जावळे17. पंकज भगवान भारंबे18. अनिता अविनाश पाटील
- अनुप सरोदे20. सरला तायडे21. सुमन वारके22. रुपाली हेमराज सरोदे23. गोकर्णी संदीप सरोदे24. साधना सुहास राणे25. सरोज मनोज भिरुड26. मुर्तूजा खान (चालक) 7. एक बेपत्ता
बसमध्ये यांचा होता समावेश
1) अनंत ओंकर इंगळे, 2) सीमा अनंत इंगळे, 3) सुहास राणे, 4) सरला राणे, 5) चंदना सुहास राणे, 6) सुनील जगन्नाथ धांडे, 7) नीलीमा सुनील धांडे, 8) तुळशीराम बुधो तायडे, 9) सरला तुळशीराम तायडे, 10) आशा समाधान बावस्कर, 11) रेखा प्रकाश सुरवाडे, 12) प्रकाश नथ्थू सुरवाडे, 13) मंगला विलास राणे, 14) सुधाकर बळीराम जावळे, 15) रोहिणी सुधाकर जावळे, 16) विजया कडू जावळे, 17) सागर कडू जावळे, 18) भारती प्रकाश जावळे, 19) संदीप राजाराम सरोदे, 20) पल्लवी संदीप सरोदे, 21) गोकर्णी संदीप सरोदे, 22) हेमराज राजाराम सरोदे, 23) रुपाली हेमराज सरोदे, 24) अनुप हेमराज सरोदे, 25) गणेश पांडुरंग भारंबे, 26) सुलभा पांडुरंग भारंबे, 27) मिनल गणेश भारंबे, 28) परी गणेश भारंबे, 29) शारदा सुनील पाटील, 30) कुमुदिनी रवींद्र झांबरे, 31) शारदा सुनील पाटील, 32) नीलीमा चंद्रकांत जावळे, 33) ज्ञानेश्वर नामदेव बोंडे, 34) आशा ज्ञानेश्वर बोंडे, 35) आशा पांडुरंग पाटील, 37) सरोज मनोज भिरुड, 38) पंकज भागवत भंगाळे, 39) वर्षा पंकज भंगाळे, 40) प्रवीण पांडुरंग पाटील, 41) अविनाश भागवत पाटील, 42) अनिता अविनाश पाटील.
नेपाळ सरकारशी आमचा संपर्क सुरु – पालकमंत्री
नेपाळ येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. नेपाळ सरकार आणि दुतावासाशीही संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. बसमध्ये 43 प्रवाशी असल्याची माहिती समोर आली असून त्यापैकी 12 जणांवर काठमांडू येथे उपचार सुरू असल्याची माहिती आली आहे. लवकरच प्रवाशांबाबत माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना शक्य ती मदत करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
ना.रक्षा खडसे, आ.संजय सावकारे नेपाळकडे रवाना
घटनेची माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री ना.रक्षा खडसे व भुसावळचे आ.संजय सावकारे यांनी आधी नेपाळमधील जखमी प्रवाश्यांची व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधला. यावेळी आ.एकनाथ खडसे यांनीही ना.रक्षा खडसे यांच्या माध्यमातून जखमी प्रवाश्यांशी चर्चा केली व रक्षा खडसे अन् आ.संजय सावकारे व भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे तातडीने नेपाळकडे रवाना झाले आहेत.
पोलीस धावले घटनास्थळी
नेपाळमधील तनुहा जिल्हा पोलीस कार्यालय डीएसपी दीपकुमार राय यांनी म्हटले की, यू.पी.-एफ.टी.-7623 क्रमांकाची बस नदीत कोसळल्याची माहिती मिळताच आम्ही घटनास्थली रवाना झालो. नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलासह नेपाळ आपत्ती व्यवस्थापनाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक माधव पौडेल यांच्या नेतृत्वाखाली 45 पोलीस अधिकार्यांच्या पथकासह अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे.
नेपाळ गेलेल्या प्रवाशांसाठी सरकारचे प्रयत्न – ना.महाजन
नेपाळ येथे घडलेली अपघाताची घटना अत्यंत दु:खद आहे. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील प्रवाशांचा त्यात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दुतावासशी संपर्क साधून प्रवाशांची माहिती घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याची प्रतिक्रीया ना. गिरीश महाजन यांनी दिली.
पार्थिव लवकरच आणणार-फडणवीस
राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात आहेत. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.