Wednesday, April 30, 2025
Homeनगरपाणी टंचाई निवारणार्थ जिल्ह्यासाठी 75 लाख

पाणी टंचाई निवारणार्थ जिल्ह्यासाठी 75 लाख

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ग्रामीण भागात पेयजल टंचाई निवारणार्थ शासनाच्या निकषानुसार पिण्याच्या पाण्याच्या टचाई निवारणार्थ उपाययोजनांवरील प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी एकोणीस कोटी चौर्‍याहत्तर लाख,अठ्ठावीस हजार रुपयांचा निधी अटींवर वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. यात नगर जिल्ह्यासाठी 75 लाखांचा समावेश आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने हिवाळ्यातच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. उन्हाळ्यात तर ही टंचाई तीव्र होणार आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. सरकारने याची दखल घेत 14 तालुक्यांमधील 96 महसुली मंडळांचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश केला आहे. या गावांना दुष्काळी परिस्थितीत देण्यात येणार्‍या सर्व सवलती लागू होणार आहेत.

आताही ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी निधी दिला आहे. हा निधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे थेट वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दुष्काळ असल्याने प्राधान्याने टँकरने पाणी पुरवठा करणे, विहीर अधिग्रहण या उपाययोजनांना निधी वितरीत करण्यात येणार आहे.

देयके अदा करताना खाजगी टँकरवर जीपीएस प्रणाली बसवलेली असेल व जीपीएस प्रणालीवर ज्या टँकरच्या फेर्‍यांची नोंद होईल त्याच फेर्‍या देयकाकरिता अनुज्ञेय राहील.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘प्रवरे’च्या आजी-माजी संचालकांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात साडेआठ कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी आजी-माजी संचालक, साखर आयुक्त पुणे, संबंधित दोन...