Wednesday, June 26, 2024
Homeनाशिकइंदिरानगर, पाथर्डी परिसरात पाण्याची टंचाई; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

इंदिरानगर, पाथर्डी परिसरात पाण्याची टंचाई; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

इंदिरानगर | प्रतिनिधी

- Advertisement -

इंदिरानगर प्रभाग क्रमांक ३० व पाथर्डी भागातील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये काही भागात कमी दाबाने, पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने माजी नगरसेवक व नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात नाशिक मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

इंदिरानगर एकता कॉलनी, श्रद्धा विहार ,चर्च परिसरात मागील दीड दोन महिन्यापासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. रहिवाशांना स्वखर्चाने पाणी टँकर मागवा लागत असून आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

या परिसरासाठी मुकणे धरणातून पाईपलाईन टाकून योजना कार्यान्वित झालो खरी पंरतू पाण्याचा प्रश्न अधून मधून डोके वर काढत असल्याने पाणीपुरवठा विभागाबद्दल रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात माजी नगरसेवक सतीश सोनवणेनी, रहिवाशांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

तर प्रभाग क्रमांक ३१ मध्ये आनंदनगर भाग, दामोदर नगर, नरहरी नगर ,सर्वे क्रमांक ३१५ मधील स्वामी समर्थ केंद्र, देवराम नगर व इतर भागात मागील पंधरा दिवसापासून मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांना पाण्याची समस्या निर्माण होत आहे.

याबाबतीमध्ये वेळोवेळी पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी करण्यात आल्याचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष एकनाथ नवले यांनी सांगितले आहे लवकरात लवकर प्राणी प्रश्न न सुटल्यास महिला सह आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे सुरेखा राठोड ,शितल पवार, जयश्री सोनवणे ,वंदना नांद्रे, सारिका धनगर, सोनाली मोराणकर, सोनाली गवारे, दिपाली सोनार, जयश्री पाटील, वैशाली मोहाड यांनी निवेदन दिले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या