Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकपाणीसाठा संरक्षित करण्यासाठी धरणावरील विद्युत पुरवठा खंडित

पाणीसाठा संरक्षित करण्यासाठी धरणावरील विद्युत पुरवठा खंडित

नांदगाव । प्रतिनिधी

संपुर्ण ऑगस्ट महिना कोरडाठाक गेल्याने खरिप हंगाम (Kharif Season) वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील धरणांतील पाणीसाठा (Dam Water Storage) संपुष्टात येत असल्याने शिल्लक मृत पाणीसाठा (Dead Stock) संरक्षित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये महावितरण कंपनीने धरणावरील विद्युत पुरवठा खंडित केला (Electricity Cutt) आहे.

- Advertisement -

पाणीसाठा कमी झाल्याने भविष्यात पिण्याचे पाणी व जनावराच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे माणिकपुंज, नाग्यासाच्या तसेच कासारी क्रमांक १ व २ या धरण परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

नांदगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे तालुक्यातील त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. पाऊस नसल्याने पिके जगवायची कशी असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र होत आहे. आमदार सुहास कांदे यांनी टंचाई सदृश्यतेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतल्यानंतरमहसूल विभागाकडून पिकांच्या प्राथमिक आणेवारीचे काम पूर्ण केले जात आहे.

तालुक्यात सरासरीपेक्षा खुपचं कमी पाऊस झाल्यामुळे खरिप हंगाम हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात देखील शास्त्रीनगर, खादगाव,नवसारी, धोटाणे, बोयगाव या गावात टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. सध्या तालुक्यात १९ गावे, ५५ वाड्या वस्त्यांना दररोज ४४ फेऱ्या द्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.

माणिकपूंज व नाग्या साग्या धरणातील उपयुक्त जलसाठा संपुष्टात आला असून नाग्या साग्या धरणात ८० द.ल.घ.फु मृत शिल्लक आहे. तर माणिकपूंज धरणात ७४ द.ल.घ.फु पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या गिरणा धरणात ३७ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या मालकीच्या दहेगाव धरणात केवळ २० टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने शहरात चार दिवसाने होणारा पाणीपुरवठा आता दहा दिवसांनी होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

भविष्यातील पाणी टंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरून शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी पाण्याचा वापर होऊ नये म्हणून माणिकपुंज धरणावरील विद्युत पुरवठा कालच बंद करण्यात आला असून अन्य तीन ठिकाणचा विद्युत पुरवठा आज खंडित केला आहे.

-डी.वाय.वाटपाडे, उपअभियंता नांदगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या