Thursday, September 19, 2024
HomeनाशिकNashik News : जिल्ह्यात पावसाची उघडझाप; गंगापूर धरणातील पाणीसाठा 'इतक्या' टक्क्यांवर

Nashik News : जिल्ह्यात पावसाची उघडझाप; गंगापूर धरणातील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर

नाशिक | Nashik

- Advertisement -

गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसाने (Rain) विश्रांती घेतली आहे.त्यामुळे दिवसभर ऊन सावलीचा खेळ नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. तर अधूनमधून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ होतांना पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा : नाशिक कृउबा समितीच्या उपसभापतीपदी माळेकर बिनविरोध

यामध्ये नाशिक शहारासह (Nashik City) ग्रामीण भागांत देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह (Gangapur Dam) जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांच्या पाणीपातळीत वाढ झालेली दिसत आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सराईत गग्गा अटकेत; गावठी कट्टा, काडतुस हस्तगत

यातील नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा ८६.१३ टक्क्यांवर पोहचला आहे. तर धरण समूहात ८३.६८ टक्के साठा आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील (District) मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये आजपर्यंत (दि. १४ ऑगस्ट) ६६.८९ टक्के इतका पाणीसाठा आहे.

हे देखील वाचा : “एकनाथ शिंदे हे सर्वात लोचट मुख्यमंत्री”; संजय राऊतांची घणाघाती टीका

तसेच जिल्ह्यातील कडवा धरण (Kadwa Dam) ८१.५८, दारणा धरण ८७.३७, पालखेड ५४.६७ टक्के, मुकणे ५९.१७ टक्के,करंजवण ६७.३८ टक्के, गिरणा ४४.०७ इतके टक्के पाणीसाठा आहे. तर भावली, वालदेवी, हरणाबारी, केळझर, भोजापूर ही धरणे ओव्हरप्लो झाली आहेत.जूनपासून पाऊस सुरु झाल्यानंतर काही प्रमाणांत धरणांच्या (Dam) पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मात्र, काही धरणांची स्थिती अजूनही चिंताजनक आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या