Sunday, April 27, 2025
Homeनगरटँकर सुरू असणार्‍या 200 गावात पाण्याच्या टाक्या

टँकर सुरू असणार्‍या 200 गावात पाण्याच्या टाक्या

टंचाईच्या झळा : 188 गावे आणि 113 वाड्यांवर खासगी विहीर अधिग्रहीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चालू उन्हाळ्यात शेवटच्या दीड ते दोन महिन्यांत उन्हाची तीव्रता वाढल्याने टंचाईची तीव्रता झपाट्याने वाढली. यामुळे सरकारी आणि खासगी पाण्याच्या टँकरची संख्या झापट्याने वाढतांना दिसत आहे. जिल्ह्यातील जवळपास 5 लाख 85 हजार नागरिकांना पाण्याच्या टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू असून टँकर सुरू असणार्‍या गावापैकी हे पाणी साठवणूक करण्यासाठी अवघ्या 200 गावात पाण्याच्या टाक्या उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अहवालात नमुद करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात चालूवर्षी मार्चअखरेनंतर पाण्याच्या टँकरची संख्या वाढत गेली. एप्रिल महिन्यांत ही संख्या झापट्याने वाढली. मे महिन्यांतील दहा तारखनंतर अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे उन्हाच्या तीव्रतेत काही प्रमाणात घट आली असली तर पाण्याच्या टँकरवर त्याचा परिणाम झालेला नाही. जिल्ह्यातील 293 गावे आणि 1 हजार 578 वाड्यावस्त्यांवर सरकारी व खासगी असे 316 पाण्याचे टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात

करण्यासाठी 188 गावे आणि 113 वाड्या वस्त्यांवर 267 उपाययोजना राबवण्यात येवून त्याठिकाणी खासगी विहीरी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रशासनाच्यावतीने टंचाई आराखड्यात 16 लाख 9 हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. दरम्यान, जिल्ह्यात पाण्याचे टँकर सुरू असणार्‍या गावे आणि वाड्या वस्त्यांपैकी 200 ठिकाणी सार्वजनिक पाण्याच्या टाक्या उपलब्ध आहेत. उर्वरित ठिकाणी सार्वजनिक विहीर, ग्रामस्थांच्या वैयक्तिक टाक्या याठिकाणी पाण्याच्या टँकरचे पाणी उतरवून त्याचे वितरण करण्यात येत आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अहवालात नमुद आहे.

84 कोटींचा आरखडा
जिल्ह्यात ऑक्टोबर 2023 ते जून 2024 या कालावधीत संभाव्य पाणी टंचाईनिवारणार्थ 84 कोटी 47 लाख रुपयांच्या टंचाई आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे. यात पाणी पुरवठा करणार्‍या विहीरी खोल करणे अथवा गाळ काढणे 4 लाख 24 हजा रुपये, विहरी अधिगृहीत करणे 16 लाख 9 हजार, पाण्याच्या टँकरसाठी 80 कोटी, नळ दुरूस्ती करणे 2 लाख अशा तरतुदीचा समावेश आहे.

तालुक्यातील टाकी
संगमनेर 31, अकोले 4, नगर 29, पारनेर 32, पाथर्डी 83, कर्जत 21 यांचा समावेश आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terrorist Attack : आतापर्यंत ‘इतक्या’ पाकिस्तान्यांनी देश सोडला

0
जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कठोर निर्णय घेतला असून, पाकिस्तानी...