Friday, May 3, 2024
Homeनाशिकनगरपरिषदेच्या जलवाहिनीतून पाणीचोरी; रहिवाशांकडून कारवाईची मागणी

नगरपरिषदेच्या जलवाहिनीतून पाणीचोरी; रहिवाशांकडून कारवाईची मागणी

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

नगरपरिषदेच्यावतीने (nagar parishad) सुरु असलेला पाणीपुरवठा (Water supply) परस्पर बंद करुन आपल्या भागात वळवून घेण्याचा प्रकार शहरातील कानडी मळा परिसरात घडत असून ज्यांना पाणी मिळण्याचा दिवस आहे,

- Advertisement -

त्यांच्या हक्काचे पाणी पळविण्याच्या या प्रकारानंतर परिसरातील रहिवासी संतप्त झाले आहेत. पाणीचोरी (Water theft) करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत व चौथ्या दिवशी येणारे हक्काचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

कडवा धरणातील (kadva dam) पाणीसाठा कमी झाल्याने सध्या नगरपरिषदेच्यावतीने शहरात चौथ्या दिवशी एक तास पाणीपुरवठा (Water supply) केला जातो. सध्याच्या उन्हाळ्याचा विचार करता आवश्यक तेवढे पाणी या तासाभरात जवळपास सर्वांनाच मिळते. मात्र, बारागाव पिंप्री (Baragaon Pimpri) रस्त्यावरील कानडी मळा समोरील रहिवाशांना गेल्या तीन-चार महिन्यांपासून पुरेशा दाबाने पाणी येत नाही. अनेकदा तर नळाला पाणीच येत नाही. तास-तासभर मोटारी सुरु ठेवूनही पिण्यापुरतेही पाणी येत नसल्याने या भागातील रहिवाशी हवालदिल झाले आहेत.

परिसरातील रहिवाशांनी मुख्याधिकारी संजय केदार (Chief Officer Sanjay Kedar), पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता हेमलता दसरे (Hemalatha Dussehra, Engineer, Water Supply Department) यांची वेळोवेळी भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी साकडे घातले. त्याप्रमाणे त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या (Water Supply Department) माध्यमातून पूर्ण पाईप लाईनची तपासणी केली. मात्र, गोंदेश्वर मंदिराजवळील जलकुंभापासून अंतर जास्त असल्याने पाणी पोहचण्यात अडचणी येत होत्या. त्यामूळे रस्त्याच्या उजव्या बाजूच्या पाईप लाईनवरून या रहिवाशांना नगर परिषदेने पाणीपुरवठा सुरु केला. त्यानंतर काही दिवस पुरेशा दाबाने पाणी आले. मात्र, गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पाणी सोडल्यानंतर काही मिनिटात अचानक पाणीपुरवठा बंद होऊ लागल्याने रहिवाशांच्या तक्रारी वाढल्या.

त्यानंतर परिसरातील रहिवाशांसह पाणीपुरवठा करणार्‍या सेवकांनी संपूर्ण पाईपलाईन (Pipeline) तपासली असता कानडी मळ्यासमोरील पेट्रोल पंपाशेजारी असणारा व्हॉल्व परस्पर फिरवून पाणी रस्त्याच्या दुसर्‍या बाजूच्या भागात वळवल्याचे स्पष्ट झाले. पेट्रोल पंपाच्या समोरील रहिवाशांना कानडी मळ्यातील जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो. तरीही जुनी पाईपलाईन तशीच असल्याचा फायदा घेऊन समोरच्या पाईपलाईनचे पाणी व्हॉल्व फिरवून आपल्याकडे वळवून पाणी पळविण्यात येत असल्याचे त्यातून स्पष्ट झाले.

शहरातील सर्वांनाच बाराशे रुपये पाणीपट्टी (water tax) आहे. पेट्रोल पंपासमोरच्या रहीवाशांंना एकच पाणीपट्टी भरुन दोनदा पाणी मिळते. तर पिंप्री रस्त्याच्या डाव्या बाजूच्या रहिवाशांना एकदाही पाणी मिळत नाही. त्यामुळे आमच्या हक्काचे पाणी चोरणार्‍यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी बाळासाहेब आरोटे, रंगनाथ घोटेकर, विलास पाटील, अशोक शिंदे, सोमनाथ वाळूंज, बाळासाहेब वाळूंज यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या