Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यागंगापूर धरणातून १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

गंगापूर धरणातून १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमध्ये श्रीगणेशच्या आगमनासोबतच पावसाचेदेखील (Rain) पुनरागमन झाले आहे. त्यामुळे नाशिक (Nashik), त्र्यंबकेश्वर (Trambakeshwar), इगतपुरी (Igatpuri) परिसरात पावसाचा जोर वाढला आहे.,..

- Advertisement -

IMD :राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार, नाशिकसाठी यलो अलर्ट

धरणक्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने गंगापूर धरण (Gangapur Dam) आता ९५ टक्के तर दारणा (Darna Dam) ९७ टक्के भरले आहे. नाशिकच्या धरण क्षेत्रात ९० टक्के साठा झालेला आहे. त्यामुळे आता धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

दारणातून ३,५००, नांदूरमध्यमेश्वरमधून (Nandurmadhyameshwar) ५,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज दुपारी १२ वाजेपासून गंगापूर धरणातून ५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. सायंकाळी ५ वाजता १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

Video : धरणातून आणखी १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

कडवा धरण क्षेत्रात दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे सांडवा विसर्ग संध्याकाळी ६ वाजता २२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पुराच्या नियंत्रणासाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या