दिल्ली | Delhi
अमेरिकेतील America वृत्तपत्राने फेसबुकबाबत Facebook एक खळबळजनक खुलासा केला होता. फेसबुक भारतातील भाजपा नेते आणि आरएसएस RSS यांच्या द्वेषपूर्ण भाषणांना दुर्लक्षित करत facebook ignores BJP Leaders Hate Speeches असल्याचा खुलासां अमेरिकेतील एका वृत्तपत्राने केला होता. या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटले होते की, “भाजपा आणि आरएसएस हे फेसबुक आणि व्हॉट्स ऍप Whats App ला नियंत्रित करतात. त्या द्वारे खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवत आहे”. देखील टीका भाजपवर आणि आरएसएस वर केली होती.
यावर फेसबुकने स्पष्टीकरण देताना म्हंटलेआहे की,”आमची धोरण ठरवताना आम्ही कुठलाही पक्ष पाहत नाही. आम्ही द्वेषपूर्ण आणि हिंसाचार घडवणारी फेसबुक वरील सामुग्री प्रतिबंधित करतो. आम्ही या धोरणांची अंमलबजावणी करण्यास आणि आमच्या प्रयत्नांचे नियमित मूल्यांकन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. जेणेकरुन निष्पक्षता आणि अचूकता कायम राहील”. असे स्पष्टीकरण फेसबुकने केले आहे.