Wednesday, March 26, 2025
Homeमुख्य बातम्या‘पुणे- नाशिक रेल्वेचा प्रश्न मार्गी लावू’ - उपमुख्यमंत्री अजित पवार

‘पुणे- नाशिक रेल्वेचा प्रश्न मार्गी लावू’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे । प्रतिनिधी Pune

पुणे-नगर-नाशिक रेल्वे मार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे.या रेल्वे मार्गाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल.त्यासाठी गरज पडल्यास दिल्लीला जाऊ,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

- Advertisement -

राष्ट्रवादीतील फुटीनंतर आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती आल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच बारामतीला भेट दिली. त्यावेळी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत पवा म्हणाले की, मी सत्तेसाठी हापापलेला नेता नाही, सत्ता काय येते आणि जाते, पण मिळालेल्या पदाचा वापर हा इथल्या लोकांच्या विकासासाठी करणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. बारामतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत होईल असे वाटले नव्हते, आज मी जो काही आहे तो बारामतीकरांमुळेच असेही ते म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

बारामतीकरांनी गेल्या निवडणुकीत मला 1 लाख 68 हजारांच्या मताधिक्यांने निवडून दिले, त्यामुळे माझी जबाबदारी वाढली असून त्यासाठी मी सकाळी पाच वाजल्यापासून काम करतोय, इथल्या लोकांना भविष्यात काही त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करतोय असे अजित पवारांनी सांगितले.

कामामध्ये रमणारा मी कार्यकर्ता असल्याचे सांगत बारामतीकर एवढ्या उत्साहात स्वागत करतील असे वाटत नव्हते असे अजित पवार म्हणाले. ते म्हणाले की, आज जो काही आहे तो बारामतीकरांमुळेच आहे. फुले, शाहू महाराज आणि आंबेडकरांचा विचार मी कृतीतून पुढे नेणारा कार्यकर्ता आहे. उद्याची 50 वर्षे डोळ्यासमोर ठेऊन मी कार्य करतो. त्यावेळी कधी अतिक्रमण करावे लागते आणि काही कठोर निर्णय घ्यावी लागतात. पण ती गरजेची असतात. मी कधीच कुणाला उघड्यावर सोडले नाही.

अजित पवार म्हणाले की, मी सत्तेसाठी हापापलेला कार्यकर्ता नाही, सत्ता काय मिळत असते आणि जातही असते. मिळालेल्या पदाचा उपयोग हा सर्वसामान्यांसाठी करणे आवश्यक आहे. येत्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घ्याव्या लागतील. सुदैवाने राज्याची तिजोरी आपल्या ताब्यात आहे, त्यामुळे या भागातील जनतेची कामे जोमाने करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं. पुणे-नगर- नाशिक ही रेल्वे रेंगाळली आहे, येत्या काळात त्यासाठी पाठपुरावा करणार, वेळ पडल्यास दिल्लीत जाऊन वरिष्ठांची भेट घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News: नाशिकरोड पोलिसांची चाळीस रिक्षांवर दंडात्मक कारवाई

0
नाशिकरोड | प्रतिनिधीनाशिकरोड पोलिसांनी रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उचलला असून सुमारे ४० रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त...