Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमधारदार शस्त्रे घेऊन शहरात दहशत करणारे तिघे पकडले

धारदार शस्त्रे घेऊन शहरात दहशत करणारे तिघे पकडले

शहर पोलिसांची कारवाई || तलवार, कोयता, चॉपर जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

धारदार शस्त्रे घेऊन शहरात दहशत करणार्‍यांवर शहर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शस्त्राच्या धाक दाखवून लुटमार करणे, परिसरात दहशत करणे, प्राणघातक हल्ला करण्यासाठी सर्रास धारदार शस्त्रांचा वापर केला जात आहे. शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकासह तोफखाना व कोतवाली पोलिसांनी शस्त्र बाळगणार्‍या तिघांविरूध्द गुन्हे दाखल करून शस्त्र जप्त केली आहेत.

- Advertisement -

शहरातील आयुर्वेद कॉलेज ते अमरधाम रस्त्यावर रिमांड होम समोर हातात तलवार घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत दहशत निर्माण करणार्‍या तरुणाला शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने शुक्रवारी (14 जून) रात्री 10.15 च्या सुमारास पकडले. राजेंद्र गोलासिंग टाक (वय 31 रा. संजयनगर, काटवन खंडोबा) असे पकडलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून तलवार जप्त केली. त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपोवन रस्त्यावरील युनिटी ग्राउंड येथे एक व्यक्ती हातामध्ये तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने सदर ठिकाणाहून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव उत्कर्ष सुनील गाडे (वय 27 रा. शिवनगर, सावेडी) असे सांगितले. त्याच्याकडे तलवार व चॉपर मिळून आले. ते जप्त करून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गाडे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व आर्म अ‍ॅक्ट कलमानुसार गुन्हा दाखल असून तो त्या गुन्ह्यात पसार होता.

रेल्वे पुलाजवळ, कायनेटीक चौक येथे एक व्यक्ती हातामध्ये कोयता घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने सदर ठिकाणी संशयित व्यक्तीला पकडले. त्याने त्याचे नाव अक्षय भगवान खंडागळे (वय 24 रा. अचानक चाळ, रेल्वे स्टेशन, नगर) असे सांगितले. त्याच्या ताब्यात धारदार लोखंडी कोयता मिळून आला. तो पोलिसांनी जप्त करून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident : आयशर-कारच्या अपघातात पती-पत्नी ठार; मुलगी गंभीर जखमी

0
ओझे | विलास ढाकणे | Oze दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर झालेल्या आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये (Accident) पती-पत्नी जागीच ठार (Killed)...