Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात १५ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज, जाणून घ्या कुठे यलो आणि ऑंरेज...

राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज, जाणून घ्या कुठे यलो आणि ऑंरेज अलर्ट?

मुंबई l Mumbai

राज्यात (Maharashtra) मागच्या महिन्यात दडी मारलेल्या पावसाने राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनापासून जोरदार कोसळायला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

मागील काही दिवसांमध्ये मुंबई(Mumbai) , कोकणासह (Konkan) राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा पाहायला मिळाला. आता भारतीय हवामान विभागाने (Meteorological Department) पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

आयएमडीने (IMD) म्हटले आहे की, येत्या १५ तारखेपर्यंत राज्यात हलक्या, ते मध्यम आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता (Weather Forecast) आहे. हवामान विभागाने कोकण किनारपट्टी, महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे चार ते पाच दिवस मान्सून चांगलाच सक्रीय राहणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. या मान्सूनच्या स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर आणि रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि सातारा यासह राज्यातील इतर भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, पावसाची तीव्रता आणि बदलती नैसर्गिक स्थिती पाहून त्यात बदल केला जाईल, असेही हवामान विभाने म्हटले आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पुढचे पाच दिवस ऑरेंज अलर्ट असेल. तर उर्वरीत महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट असेल. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातही अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. त्यासोबतच कोकणातही अशीच स्थिती आहे. विदर्भातही विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात पाऊस आज जोरदार बॅटींग करण्याची शक्यता आहे. नांदेड हिंगोली यांसह इतर ठिकाणीही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने मराठावाड्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याचे अवाहन केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या