Saturday, April 25, 2026
Homeनाशिकमोठी बातमी! भावली धरणात पाच जण बुडाले

मोठी बातमी! भावली धरणात पाच जण बुडाले

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri 

तालुक्यात असलेल्या भावली धरणावर (Bhavali Dam) नाशिकरोड येथून फिरण्यासाठी आलेल्या पाच जणांचा भावली धरणामध्ये बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक  माहिती अशी की, अनस खान दिलदार खान (वय १५), हनीफ अहमद शेख (वय २४), मीजबाह दिलदार खान (वय १६), नाझिया इमरान खान (वय १५) व ईकरा दिलदार खान (वय १४) अशी मृतांची नावे असून मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश आहे. मृत पावलेले हे सर्वजण गोसावी वाडी, जेलरोड, नाशिकरोड येथील रहिवासी आहेत.

आज मंगळवार (दि. २१) रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. नाशिकरोड (Nashik Road) येथून एकूण नऊ जण भावली धरणावर रिक्षेतून फिरण्यासाठी आले होते. त्यापैकी पाच जणांचा बुडून मृत्यू झाला असून चार जण वाचले आहेत. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते.

दरम्यान, हे पाचही जण बुडाल्याचे समजताच स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढून इगतपुरी येथील रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. तसेच घटनेची माहिती मिळताच मृतांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले असून या घटनेमुळे गोसावी वाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

धारणगाव खडकच्या भोंदूबाबाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
शिरवाडे वाकद / लासलगाव | प्रतिनिधी Shirvade Vakad / Lasalgaon निफाड तालुयातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री...