Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रWeather Update : 'ऑक्टोबर हिट'च्या झळा! घामाच्या धारांनी नागरिक हैराण

Weather Update : ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा! घामाच्या धारांनी नागरिक हैराण

मुंबई | Mumbai

देशभरातून मान्सून माघारी फिरत आहे. यामुळे राज्यातील पावसाने आता विश्रांती घेतली आहे. यामुळे राज्यात संमिश्र वातावरण गेल्या काही दिवसांपासूंन अनुभवायला मिळत आहे.

- Advertisement -

दिवसा सर्वाधिक तापमान आणि रात्री थंडी पडत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच आता ऑक्टोबर हिटचा तडाखा बसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. विदर्भात कमाल तापमान ३५ च्या पुढे गेले आहे. उकाडा वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच मुंबई पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यात उकाडा वाढला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार पुढील आठवडाभर शहर आणि उपनगरांमध्ये उन्हाचे तीव्र चटके सोसावे लागणार आहे. आयमडीच्या आठवड्याभराच्या हवामान अंदाजानुसार १० ते १३ ऑक्टोबर २०२३ दरम्यान कमाल तापमान हे ३२ अंश सेल्सिअस असणार आहे. त्यानंतर तापमानात काही प्रमाणात घट दिसून येईल. १४ ऑक्टोबरला किमान तापमान हे ३१ अंश तर १५ ऑक्टोबरला ३० अंश सेल्सिअस असू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील मान्सूनने (Monsoon) परतीचा प्रवासासाठी वाटचाल सुरु केल्यामुळे २४ तासांत तापमानात ८ ते १० अंशांनी वाढ झाल्याने ऑक्टोबर हिटचा चटका राज्यभरात सर्वत्र जाणवू लागला आहे. मागील २४ तासांत सर्वत्र कोरडे वातावरण पाहायला मिळाले आहे. ६ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील कमान तापमान हे २४ ते २५ अंशांवर होते. मुंबईत रविवारी ३३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. अशातच हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की, ११ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी परतण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या