ज्यो. श्री रवींद्र भगवान पाठक,(ठाणे, मुंबई)
मेष : संमिश्र फळ देणारा काळ
पैशाचे व्यवहार हात राखून करावेत. समाजामध्ये मानाचे स्थान प्राप्त होऊ शकेल. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. भाग्योदयातील अडथळे दूर होतील. संततीकडून सन्मामनाने वागणूक मिळेल. वैरभाव ठेवणार्या व्यक्तीच्या मनात नकळत सहानुभूती तयार होऊन, त्यांच्या वागण्यात बदल दिसून येईल. नोकरदारांना संमिश्र फळ देणारा हा काळ आहे. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. भविष्याची तरतूद म्हणून उत्तम नियोजन घडू शकेल. शुभ तारखा : 16 ते 20
वृषभ : उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील
आठवड्याच्या सुरुवातीला थोडीफार धावपळ करावी लागेल. उच्च पदावर नियुक्ती केली जाऊ शकते. स्वभावात अचानक होणारा बदल साथीदाराला अस्वस्थ करणारा असेल. शास्त्र विषयाच्या अभ्यासाची ओढ लागेल. व्यसनाधीनता वाढणार नाही याबाबत काळजी घ्यावी. वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांबाबत रुची वाढेल. परमेश्वरीय आराधनेवरील विश्वास दृढ होईल. आर्थिक सुबत्ता येईल. द्रव्याचा संग्रह करण्यासाठी अथवा आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे.
शुभ तारखा : 16, 17, 18 , 21, 22
मिथुन : पाय जमिनीवर रहातील ही काळजी घ्या
अनेक नवनवीन लोकांचा स्नेह संबंध जोडला जाईल. आपले पाय जमिनीवरच रहातील याची काळजी घ्या. घरामध्ये नवीन पाहुणा येऊन वातावरण आनंदी बनेल. जबाबदारी स्वीकारताना मनाची दोलायमान स्थिती उत्साहास बाधक ठरू शकेल. लहान लहान मुलांमध्ये निर्माण होणारी नम्रता कुतूहलाचा विषय बनू शकेल. आर्थिक स्थितीत होणार्या सुधारणेमुळे कामकाजातील पुढच्या दिशा ठरविण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. शुभ तारखा : 19, 21, 22
कर्क : तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे
वडीलधार्या व्यक्तींचे अनमोल मार्गदर्शन जीवनाची दशा आणि दिशा बदलणारे ठरेल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. शब्द हे एक शस्त्र आहे, ते सांभाळूनच वापरले पाहिजे. आपल्या आचरणाने आपलाच नावलौकिक कमजोर होत तर नाही ना याबाबत काळजी घ्या. मनाच्या वेगाने चालताना सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे. व्यावहारिक भागीदार सांभाळून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. वेळप्रसंगी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.
शुभ तारखा : 16, 17, 18, 21, 22
सिंह : खर्चावर नियंत्रण ठेवा
आपण करीत असलेल्या कामावर विश्वास निर्माण करणे हिताचे ठरेल. इतरांच्या सल्ल्याने आपले नुकसान तर होत नाही ना याबाबत सतर्क असावे. अकारण होणार्या खर्चावर नियंत्रण आणावे लागेल. पित्त प्रकृतीचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या हेतूविषयी शंका घेण्याऐवजी आपली कमजोरी दूर करण्याचा प्रयत्न करणे हितकारक ठरेल. कोणत्याही विषयावर चिंतन-मनन करावे. जुने येणे वसूल करण्याचा प्रयत्न करा. त्यात यश लाभेल. जवळच्या स्नेहीजनांची काळजी घेत असताना स्वतःचे हिताहित याबाबत जागृत असावे. शुभ तारखा : 16, 17, 18, 19
कन्या : कर्तृत्वाबद्दल आदर निर्माण होईल
मंगल कार्यात सहभागी व्हाल. हातून धार्मिक कार्य घडेल, अन्नदान घडून येईल. नवीन विषयाचे लेखन घडून येईल अथवा लेखनास प्रारंभ होईल. राजकारणात कार्यरत असलेल्या व्यक्तीस आपले पद सांभाळताना दगदग होऊ शकते. संगतीचा दुष्परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. मात्र हा काळ थोड्या अवधी पुरताच मर्यादित आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात राजकीय क्षेत्रात मानसन्मान वाढेल. समाजमनामध्ये आपल्या कर्तृत्वाबद्दल आदर निर्माण होईल . कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. शुभ तारखा : 16, 17, 18, 21, 22
तूळ : अधिक परिश्रमाची आवश्यकता
या आठवड्यात प्रवासाचे योग संभवतात. केलेलं काम सत्कारणी लागून त्याचे उत्तम श्रेय देखील लाभू शकेलं. वाहन चालविण्याचा मुळीच अट्टाहास करू नका. पाण्यापासून धोका संभवतो. कामकाजात अधिक परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. छोट्यामोठ्या विषयांत सामंजस्य आवश्यक वाटते. धार्मिक ग्रंथांतील संदेश जीवनास उपयोगी पडतील. मनाला सुखद आनंदाचा धक्का देणार्या गोष्टी ऐकायला मिळतील. भाग्योदयातील अडथळे दूर होतील. शुभ तारखा : 21, 22
वृश्चिक : नोकरीत बदल संभवतात
आपल्या कर्तृत्वाची वाहवा होईल. वाणीचे प्रभुत्व वाढेल. आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे. विनय भाव कमी झाल्याने चुकीचा सामाजिक संदेश जाऊ शकतो. भागीदाराच्या कलाने घ्यावे लागेल. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. राजकीय क्षेत्रात प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावे. नोकरदारांनी वरिष्ठाची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करावा. इच्छुकांच्या नोकरीत बदल संभवतात. नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर या आठवड्यात प्रयत्नांना यश येईल.
शुभ तारखा : 21, 22
धनू : वाहन चालविताना काळजी घ्या
तुमच्या विचारांना योग्य दिशा प्राप्त होईल. कामकाजाच्या संबंधित लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. अभिमान वाढावा असे कार्य घडून येईल सफरीला जाण्याचा मोह टाळावा. गायन क्षेत्रात कार्यरत असाल तर गळ्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. श्वसनाच्या विकाराची पीडा वाढू शकते. पर्यटन विषयावर अभ्यास वाढविल्यास त्यातून फायदा होईल. हनुमान चलीसा पठण केल्याने येणार्या अडचणींवर मात करता येईल. स्त्रियांसाठी कौटुंबिक जबाबदार्या वाढविणारा आठवडा ठरेल. शुभ तारखा : 19, 20
मकर : मित्र परिवाराची उत्तम साथ
हा आठवडा महत्त्वपूर्ण उलाढालीचा ठरू शकेल. व्यापार उद्योगासाठी आर्थिक तरतूद होण्यासाठी मदतगार ग्रहस्थिती आहे. कर्जाची परतफेड सहज होईल अशी आर्थिक स्थिती निर्माण होईल. शरीर धर्माची आठवण ठेवूनच कामाचा व्याप वाढवण्याचा विचार करावा. मित्र परिवाराची उत्तम साथ मिळेल. विवाहासाठी इच्छुकांसाठी उत्तम स्थळ येऊ शकेल. आठवड्याच्या उत्तरार्धात हलकासा मानसिक तणाव निर्माण होऊ शकेल. आरोग्यविषयक किरकोळ तक्रारींकडेही दुर्लक्ष करून नये. शुभ तारखा : 18, 19, 20अत्यंत,
कुंभ : शुभ परिणामकारक काळ
आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवणार्या लोकांचा सहवास लाभेल. वाणीप्रभुत्व वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत शुभ परिणामकारक काळ आहे. विशेषकरून वैज्ञानिक संशोधन करण्यात यश प्राप्त होईल. गूढ विद्याविषयात स्वारस्य वाढेल. आळसामुळे नुकसान संभवते. जुने विकार डोके वर काढू शकतात. गुप्त शत्रूंच्या कारवाया मनस्ताप वाढवणार्या ठरू शकतील. मात्र तरीही आपल्या वर्चस्वास किंचितही धक्का लागणार नाही. स्वभावातील विनयशीलता वाढेल.शुभ तारखा : 19, 21, 22
मीन : गर्व होणार नाही याची काळजी घ्या
नोकरीमध्ये पदोन्नती होईल अथवा नवीन ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामकाजात यश मिळेल. उचित कामी आप्तेष्टांचे सहकार्य मिळेल. घर खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील असाल तर यश प्राप्त होईल. साथीच्या विकारामुळे होणार्या प्रादुर्भावापासून स्वतःची काळजी घ्यावी. नवीन कार्य हाती घेताना व्यवस्थित विचारविमर्ष करून मगच निर्णय घ्यावेत. चतुष्पाद प्राण्यांचा जिव्हाळा वाढेल. कोणत्याही विषयाचा अभिमान जरूर बाळगा मात्र गर्व होणार नाही याची काळजी घ्यावी.
शुभ तारखा : 16, 17, 18, 22