मेष :भागीदारीत आर्थिक लाभ
नोकरी करणार्या लोकांसाठी प्रगतिकारक आठवडा. कार्य नवीन उत्साह आणि जोषात पूर्ण कराल. शक्य असल्यास स्वतःच्या भावनांवर काबू ठेवण्याचा प्रयत्न करा. मजा मस्तीसाठी धन खर्च कराल. देश किंवा परदेशातील यात्रा घडू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे गरजेचे. मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये कार्यरत आहे त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम नसल्याने त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेला प्रभावित करू शकते. भागीदारीच्या कार्यांमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता. शुभ तारखा : 14, 15
वृषभ : देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा
मानसिक संतुलन ठेवणे आवश्यक अन्यथा मानसिक बेचैनी आणि राग या गोष्टींमुळे तुमच्या घराचे वातावरण बिघडू शकते. आर्थिक स्थितीत निरंतर चढ उतार बघावी लागणार आहे. प्रकृतीची काळजी घ्या. अधिकार्यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. जमीन, घर, वाहन, दागिने व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीचा योग आहे. कंपनीशी निगडित कार्यांसाठी तुम्हाला विदेश यात्रा करण्याचा योग आहे. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहणे आवश्यक. वडिलांचे आरोग्य तुमच्या काळजीचे कारण बनू शकते. बायकोच्या नावावर केलेल्या गुंतवणुकीमुळे लाभ मिळतील. अचानक खर्च संभवतील. काही उपाययोजना आखली नसेल तर अडचणींना तोंड द्यावे लागेल. शुभ तारखा : 10, 11, 12
मिथुन : कामात सावधगिरी बाळगा
नशिबाची साथ मिळणार आहे. कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हसित होईल. मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. समाजात प्रतिष्ठित पद मिळू शकते. सामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरदार कामात व्यस्त राहतील. व्यवसायात भागीदार किंवा खास मित्राची मदत मिळेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक कारणांमुळे तुम्हाला विदेश यात्रा घडू शकते. शुभ तारखा : 12, 13 ,15
कर्क : भरपूर धनलाभ
आवश्यक कार्य पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल. विशिष्ट व्यक्तींचा संपर्क सुखद वाटेल. वरिष्ठांकडून सहयोग मिळेल. स्त्री पक्षाची स्थिती संतोषजनक राहील. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहणे आवश्यक. शत्रूंपासून सावध राहा. कृषी, नोकरी, जमीन, घर, सोने चांदी, फर्निचर,कपडे, कागद, मशीनरी, हॉटेल आणि रेस्टॉरंट इत्यादी व्यवसायाशी निगडित लोकांना या आठवड्यात भरपूर धनलाभ होणार आहे.
शुभ तारखा : 10, 11
सिंड : वाहन चालवताना सावधगिरी बाळगा
जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग स्वतःच्या घरातून मिळू शकतो. काही अधिक जबाबदार्या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्मसंयमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. या आठवड्यात कुठल्याही प्रकारचे नवीन धैर्य दाखवू नका. शेअर बाजार, कमिशन, दलाली इत्यादी कार्यांमध्ये आंशिक लाभ मिळण्याची उमेद तुम्ही ठेवू शकता. द्रवपदार्थांच्या व्यवसायात विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. शुभ तारखा : 13, 14, 15
कन्या : कौटुंबिक सुखात वाढ
राजकारणी व्यक्तींना यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. शासकीय कार्यात यश मिळेल. कौटुंबिक सुख वाढेल. वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. योग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. वित्तीय प्रकरणात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा वेळ अनुकूल असून त्यांच्यात एकाग्रता वाढेल आणि त्यांचे मन अभ्यासात लागेल. इंजिनियरिंग, रिसर्च आणि उच्च शिक्षण घेत असलेल्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. शुभ तारखा : 15, 16
तूळ : महत्त्वाची कार्ये पूर्ण होतील
अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकार्यांपासून लाभ मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल. दृष्टिकोनात बदल केल्याने निश्चितचे यश मिळेल. शेअर बाजार, कमिशन आणि बँकिंग क्षेत्राशी निगडित लोकांना प्रगतीसाठी नवीन संधी मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्ये पूर्ण होतील. दरम्यान आर्थिक घेवाण देवाणीच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शुभ तारखा: 13, 14
वृश्चिक : वायफळ खर्च टाळा
स्वतःवर संयम ठेवणे फारच गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा फारसा उत्तम नाही आहे, वायफळ खर्च करणे टाळावे. काळजीपूर्वक काम करा. आरोग्य नरम-गरम राहील. न्यायालयीन प्रकरणात अडकू शकता त्यासाठी खबरदारी घ्या. कामाचा भार अधिक राहील. महत्त्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. शुभ तारखा : 15, 16
धनू : घरात उत्साहाचे वातावरण
सुख सुविधांच्या वस्तूंची खरेदी कराल. भाऊ बहिणींच्या नात्यात आधीच्या तुलनेत गोडवा येण्याची शक्यता आहे. करियरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल. ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. कार्य-योजनेसाठी आणि सहकार्यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. शुभ तारखा: 12, 13
मकर : वाद विवादापासून दूर रहा
स्थगित व्यवहार गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या मार्गी राहतील. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहू शकेल. यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम वाढवावे लागतील. इतरांवर अधिक विश्वासून राहणे अहितकारक ठरण्याची दाट शक्यता आहे आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. एखादी दुःखद बातमी मिळू शकते. सर्व प्रकाराच्या वाद विवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. अचानक धनलाभ योग आहे. शुभ तारखा: 10, 11
कुंभ : शासकीय कार्यात यश मिळेल
भाऊ बहिणींबरोबर तुमचे संबंध अनुकूल राहण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सर्वांची मदत मिळणार आहे. नोकरी करणार्या लोकांचे अधिकार्यांशी संबंध उत्तम राहणार आहेत. शासकीय कार्यात यश मिळेल. जमीन, घर व स्थावर मालमत्ता खरेदी करताना जास्त गोंधळून जाऊ नका. परदेश किंवा एखाद्या दूर जागेवर जाण्याचा योग आहे. आई किंवा कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी मन अशांत करू शकते, लक्ष देणे गरजेचे आहे. शुभ तारखा: 12, 13
मीन : देवाण-घेवाण टाळा
घरगुती बाबतीत अधीरता टाळा. योग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. व्यवसायात शत्रुपक्ष तुमच्यावर वर्चस्व साधण्याचा प्रयत्न करेल. व्यवसायात व्यस्ततेमुळे तुम्ही कुटुंबाला पूर्णवेळ देऊ शकणार नाही. या वेळेस शासकीय विभागाकडून तुम्हाला व्यवसाय संबंधी नोटीस मिळू शकते. शुभ तारखा: 14, 15, 16