Thursday, March 13, 2025
HomeराजकीयPawar Family Diwali Padwa : पवार कुटुंबीयांची एकत्र दिवाळी पाडव्याची परंपरा खंडित!...

Pawar Family Diwali Padwa : पवार कुटुंबीयांची एकत्र दिवाळी पाडव्याची परंपरा खंडित! काटेवाडी अन् गोविंदबागेत कार्यकर्त्यांची गर्दी

बारामती । Baramati

दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रसचे राज्यभरातील कार्यकर्ते गोविंदबागेत पवार कुटुंबियांना दिवाळी निमित्ती दिवाळी पाडव्याला भेटून दिपावलीच्या शुभेच्छा देतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात.

- Advertisement -

मात्र यंदा पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत दोन दिवाळी पाडवे साजरे केले जात आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी यंदा दिवाळी पाडवा आयोजित करण्यात आला आहे. शरद पवारांचा गोविंदबागेत तर काटेवाडीत अजित पवारांचा दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे.

गोविंदबागेत शरद पवार कार्यकर्त्यांना, पदाधिकार्‍यांना भेटत आहेत तर काटेवाडीमध्ये अजित पवार यांच्या निवासस्थानी आज सकाळपासून कार्यकर्ते आणि पदाधिकांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे. गेल्या अनेक पिढ्या कार्यकर्त्यांच्या असतील किंवा पदाधिकाऱ्यांच्या असतील साहेबांना आणि दादांना भेटत आहेत.

दिवाळी पाडव्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुळे म्हणाल्या सध्या दिवाळीचा सण असून आपण दिवाळी साजरी करूयात. घरं फोडणे, पक्ष फोडणे असले उद्योग दिल्लीची अदृश्य शक्ती करते. त्यामुळे हे सगळं दिल्लीच्या अदृश्य शक्तीचे यश आहे, असे सुळे म्हणाल्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...