Tuesday, July 16, 2024
Homeभविष्यवेधसाप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 ऑक्टोबर 2023

साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 ऑक्टोबर 2023

मेष : घाई गडबड करू नका

- Advertisement -

हा आठवडा फारच सुख, शांती, प्रगतिदायक ठरणार आहे. अडकलेल्या कामांना गती मिळणार आहे अशी शक्यता आहे. कार्याची प्रगती पाहून निश्चित व्हाल. तुमचा समाजात सन्मान वाढेल. अपघात होण्याची शक्यता आहे, सावधगिरी बाळगणे फारच गरजेचे आहे. घाई गडबडीत कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, ज्याने तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून सावध राहा. सामाजिक समारंभात जाण्याचे योग येतील. त्यामुळे तुमची ओळख अधिक वाढेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. शुभ तारखा : 15, 16

वृषभ : स्थायी मालमत्तेपासून फायदा

या आठवड्यात तुमचे सहलीचे योग बनत आहे. एखादे धार्मिक स्थळ किंवा हिल स्टेशनाची यात्रा करू शकता. हा प्रवास नोकरी किंवा व्यवसायाशी निगडित असू शकतो, अशी शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही नवीन करार करण्यास व्यस्त असाल तसेच तुम्हाला प्रदर्शनी किंवा सेमिनारमध्ये जाण्याचा मोका मिळेल. व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला लांबच्या प्रवास किंवा विदेश यात्रेचे योग आहे. या आठवड्यात उत्पन्न वाढवण्याचा विचार करू शकता. स्थायी मालमत्तेत जर दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली तर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. या आठवड्यात तुमचे विरोधी सक्रिय होतील. महत्त्वाच्या कामांमध्ये सुरळीतरित्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील. शुभ तारखा : 16,17, 18

मिथुन : कौटुंबिक वातावरण उत्तम राहील

आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा जुने आजार त्रास देऊ शकतात. जमीन, घर, स्थायी मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग जुळून येत आहेत. नोकरी करणार्‍या जातकांसाठी हा आठवडा फार अनुकूल असून पदोन्नती तसेच पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कार्यालयात तुमचा प्रभाव वाढेल. कंपनीकडून बरीच सुविधा मिळण्याची शक्यता आहे. वारसा मालमत्तेशी निगडित प्रकरण निकाली लागतील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो. शुभ तारखा : 14, 15, 16

कर्क : बदलीचे योग

बर्‍याच वेळापासून अडकलेल्या सरकारी कामांना आता गती येईल. उच्च अधिकारी आणि प्रभावी व्यक्तीच्या मदतीने कार्य पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदात राहणार आहे. जुने वाद विवाद संपुष्टात येण्याचे दिसत आहे. संबंधांमध्ये पारदर्शकता येईल. प्रायव्हेट किंवा सरकारी नोकरीत बदलीचे योग आहे. घराची दुरुस्ती, पेंट, फर्निचर आणि इतर कार्य करण्याचे योग आहेत. तुम्ही घरात सुख सुविधांची वस्तू खरेदी कराल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. शुभ तारखा : 15, 17, 18

सिंह : आर्थिक परिस्थितीत सुधारणा

आठवड्याची सुरुवात फारच चांगली होणार आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असल्यामुळे तुम्ही थोडे निश्चिंत व्हाल. सामाजिक कार्यांमध्ये नेतृत्वाची जबाबदारी आल्यामुळे त्यात सक्रिय व्हाल. तुमच्यावर जबाबदारी वाढणार आहे पण तुम्ही केलेल्या प्रयत्नांना अद्याप यश मिळणार नाही. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. घर, वाहन इत्यादींची खरेदी करू शकता. सरकारकडून कुठल्याही स्वरूपात लाभ मिळू शकतो. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा. आरोग्य उत्तम राहील. शुभ तारखा : 12, 13, 14

कन्या : आकस्मिक धनलाभाची शक्यता

या आठवड्यात लहान सहानं ऑपरेशन करावे लागणार आहे. उद्योगाच्या बाबतीत हा आठवडा अनुकूल आहे. या वेळेस व्यवसाय विस्तारासंबंधी योजना यशस्वीपूर्वक पार पाडाल. लोन किंवा उधार दिलेले पैसे वेळेवर परत येतील. नोकरी करणार्‍या लोकांना आकस्मिक धन लाभ होण्याची शक्यता आहे. मित्र किंवा भागीदारांमुळे धन लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सुरू असलेले विवादित प्रकरण संपुष्टात येणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. आपल्या करीयरमधील ज्या ध्येयाची पूर्ती आपणास करायची आहे ते लक्ष्य निर्धारीत करा. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. शुभ तारखा : 13, 14, 15

तूळ : मेहनतीचे फळ मिळेल

या आठवड्याच्या सुरुवातीस भाग्योदय होणार आहे. मानसिक काळजी दूर होईल. संपूर्ण आठवडा कामात गुंतलेले असाल. फारच धावपळ होणार असली तरी केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला या आठवड्यात नक्कीच मिळणार आहे. तुमच्या प्रतिस्पर्ध्यांंशी सावध राहण्याची गरज आहे कारण तुमचे विरोधी तुम्हाला खाली दाखवण्याच्या प्रयत्नात असतील. स्पर्धकावर विजय मिळवाल. न्यायासंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. मान-सन्मानात वाढ होईल. शुभ तारखा : 15, 16, 17

वृश्चिक : बँक बॅलेन्स वाढेल

भाऊ बहिणींशी संबंध आधीपेक्षा जास्त सुमधुर होतील. बंधूमध्ये आधीपासून मतभेद सुरू असतील तर या आठवड्यात ते सर्व संपुष्टात येतील. या आठवड्यात कमी वा जास्त प्रमाणात प्रवासाचा योग येत असून तुम्ही धार्मिक स्थळाची यात्रा कराल. घरात सुख सुविधांच्या वस्तूंची खरेदी केल्यामुळे कुटुंब आनंदात राहील. नवीन वाहन खरेदी करू शकता. या आठवड्यात तुमचे बँक बॅलेसन्स वाढणार आहे. आपला विधायक दृष्टीकोन इतरांबरोबर समन्वय साधण्यास मदत करतो. आपल्या क्रोधावर संयम ठेवा आणि सहकार्‍यांबरोबर वादाची स्थिती टाळा. शुभ तारखा : 14, 15

मकर : कौटुंबिक प्रकरणात अडकाल

आठवड्याच्या सुरुवातीस शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवेल. बर्‍याच दिवसांपासून लांबणीवर असलेले काम पुढे सरकत नसल्याने मानसिक त्रास होईल. तसेच इतर कार्यांवर आपले लक्ष केंद्रित कराल. त्याचा परिणाम तुमच्या कामाच्या प्रदर्शनावर पडेल. या आठवड्यात कौटुंबिक प्रकरणांमध्ये तुम्ही अडकू शकता. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. धार्मिक भावना वाढेल. शुभ तारखा : 15, 16, 17

कुंभ : ठोस उपाययोजना कराल

गुरू आणि शनी तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये उत्तम लाभ देईल. तुम्हाला उद्योगात निरंतर फायदा होणार आहे. जर व्यवसायाला पुढे वाढवायचा विचार करत असाल तर त्यात निश्चित पुढे वाढू शकता. नवीन जागा, इंडस्ट्रियल पार्क, रिअल इस्टेट, संयंत्रासाठी शेड किंवा नवीन दुकानासाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. विवाहासाठी उत्सुक असणार्‍या जातकांसाठी हा वेळ अनुकूल आहे. जोडीदाराशी वादविवाद टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा शत्रूंपासून दूर राहा. शुभ तारखा : 15, 17, 18

मीन : मनोबल वाढेल

भरपूर काम असले तरी त्यातून वेळ काढून कुटुंबियांसोबत फिरायला जा. ज्यामुळे तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. शासकीय खात्याशी निगडित कार्य लवकरच संपुष्टात येतील. जर जीवनात कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर ती देखील या आठवड्यात संपुष्टात येईल. मनोबल वाढेल. कार्यातील अडचणी दूर होतील. अधिकार्‍यांकडून कामे करवू शकाल. अपत्यांचा सहयोग मिळेल. शुभ तारखा : 14, 16

- Advertisment -

ताज्या बातम्या