Monday, June 24, 2024
Homeनगरविहिरीतील जिलेटीनच्या स्फोटात 3 ठार; 3 जखमी

विहिरीतील जिलेटीनच्या स्फोटात 3 ठार; 3 जखमी

श्रीगोंद्यातील टाकळी कडेवळीत येथील सायंकाळची घटना

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

- Advertisement -

विहिरीचे काम सुरू असताना लावलेल्या सुरूंगाचा वेळेपूर्वीच झालेल्या जिलेटीनच्या स्फोटात तीन जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळीत या गावात आज सायंकाळच्या सुमारास घडली.
कामगारांची नावे समजू शेकली नाहीत. मात्र मयतापैकी एक जण बारडगाव येथील तर दोघे जण टाकळी गावातील असल्याची माहिती समोर येत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळीत या गावात एका विहिरीचे काही दिवसांपासून खोदकाम चालू होते. खडक फोडण्यासाठी विहिरीत सुरूंग करून जिलेटिनच्या कांड्या लावण्यात आल्या होत्या. त्यावेळी विहिरीत चार कामगार होते. जिलेटिनच्या वायरींगचे काम करून कामगार विहिरीच्या बाहेर येण्याच्या आतच या जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाला. त्यात विहिरीत असणारे चार कामगार मोठमोठ्या दगडांबरोबर विहिरीबाहेर फेकले गेले. यात तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.

त्याच्यावर उपचार सुरु असून इतर दोघे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. हा स्फोट कसा झाला याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

- Advertisment -

ताज्या बातम्या