Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशपश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; सिग्नलची वाट पाहत असलेल्या एक्स्प्रेसला मालगाडीची धडक

पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; सिग्नलची वाट पाहत असलेल्या एक्स्प्रेसला मालगाडीची धडक

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पश्चिम बंगालच्या दार्जलिंगमध्ये रेल्वेचा मोठा अपघात झाला. सिग्नलची वाट पाहत उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की एक्स्प्रेस रुळावरून घसरली. या अपघातात अनेकजण जखमी झाले असून प्राथमिक माहितीनुसार ४ ते ५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे.

प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार, निजबारीजवळ सिग्नलची मिळण्याची वाट पाहत एक्स्प्रेस उभी होती. यावेळी मालगाडी भरधाव वेगात आली आणि काही क्षणातच या मालगाडीने एक्स्प्रेसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की एक्स्प्रेसचे तीन डब्बे रुळावरून खाली घसरले. या घटनेत आतापर्यंत ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकिय अधिकारी घटनास्थळावर पोहोचले आहे. सध्या युध्द पातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. रेल्वे बोगीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. यासोबतच रेल्वे रुळावरून घसरलेल्या बोगींना बाजूला हटवण्याचे देखील काम सुरु आहे.

YouTube video player

दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. तसेच हा रेल्वे अपघात कसा झाला याची देखील चौकशी करण्याचे आदेश बॅनर्जी यांनी दिले आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी लोको पायलटची चौकशीही सुरू केली आहे. मालगाडीचा चालकही गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ममता बॅनर्जींनी ट्विट करत शोक व्यक्त केला
रेल्वे दुर्घटनेची माहिती ऐकून धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीडेवा भागात कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिल्याचे वृत्त आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव पथकांनी धाव घेतली आहे. बचाव पथक, वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांची टीम, रुग्णवाहिका, पोलीस आणि आपत्ती पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. युद्धपातळीवर कारवाई सुरू केली आहे, असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

अपघात कसा घडला?
आगरतळा ते सियालदहला जाणारी ट्रेन क्रमांक 13174 कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून मालगाडीने धडक दिल्यामुळे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. रंगपाणी आणि निजबारी स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...