Saturday, April 26, 2025
HomeUncategorized'ऑक्टोबर हिट' म्हणजे नेमके काय रे भाऊ?

‘ऑक्टोबर हिट’ म्हणजे नेमके काय रे भाऊ?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

ऑक्टोबरमध्ये (October) दक्षिण-पश्चिम मान्सूनचे वारे (monsoon wind) कमकुवत होतात आणि हळूहळू माघार घेऊ लागतात. पावसाळा संपून हिवाळयाला सुरुवात होण्याचा हा काळ असतो. हा बदल होत असतांना जो संक्रमणाचा काळ असतो तो ऑक्टोम्बर महिन्यात येत असतो. या दिवसांत पाऊस थांबलेला असतो अशा वेळी आकाशातुन सूर्याची किरणे सरळ धरतीला स्पर्श करत असतात. या अतिनील किरणांमुळे जी उष्णता (Hit in the atmosphere) या महिन्यात वाढते या उष्णतेलाच ऑक्टोबर हिट (October Hit) संबोधले जाते…

- Advertisement -

ऑक्टोबर (October) आणि नोव्हेंबर (November) दरम्यान, सूर्याच्या दक्षिणेकडे जाणार्‍या हालचालींसह, उत्तरेकडील मैदानांवर मान्सूनचा कुंड किंवा कमी दाबाचा कुंड कमकुवत होतो. हे हळू-हळू उच्च-दाब प्रणालीद्वारे बदलले जात असते.

यावेळी जमिनीत मुरलेले पाणी वाफ होऊन वर उडत असते. वरून सूर्याची उष्णता आणि जमीन तापून ओल्या जमिनीतील गरम वाफ होऊन वर उडणारे पाणी ( वाफ ) यामुळे दुहेरी उष्णतेचा अनुभव ऑक्टोम्बर महिन्यात घेतला जातो.

मुंबईत हा महिना उष्णतेच्या बाबतीत अगदी जीवघेणा समजला जातो. तर नाशकातही (Nashik) तपमान ३८ ते ४० अंशांपर्यंत पोहोचते. मालेगावी (Malegaon) हेच तपमान ४१ ते ४२ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. दुहेरी उष्णतेच्या फटक्याला ऑक्टोबर हिट (Octobar hit) असे संबोधले जाते.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान सूर्याच्या दक्षिणेकडे हालचाली झाल्याने मान्सूनचा किंवा उत्तर-मैदानावरील कमी दाबाचा पट्टा कमकुवत होतो.

आणि हे हळू-हळू उच्च-दाब प्रणालीद्वारे बदलला जातो. दक्षिण-पश्चिम मान्सूनचे वारे कमकुवत होते आणि हळूहळू माघार घेऊ लागते.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात उन्हाळ्याच्या पावसापासून ते कोरड्या हिवाळ्यातील परिस्थितीत बदल होण्याची वेळ येते.

मान्सूनच्या (monsoon 2021) माघारात स्वच्छ आकाश व तापमानात वाढ दिसून येते. दिवसाचे तापमान जास्त असताना, रात्री थंडावा असतो.

जमीन अद्याप ओलसर असते आणि दिवसा हवामान जास्त दमदार बनते यामुळे सामान्यत: ‘ऑक्टोबर हीट’ हिट अनेकांना सहन होत नाही.

त्यामुळे वातावरणीय बदल झाल्यांनतर अनेकांना दवाखान्याची पायरी चढावी लागते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांत्वन

0
पुणे । प्रतिनिधी Pune जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...