Tuesday, May 21, 2024
Homeजळगावजे महाजन करु शकत नाही, ते मी करु शकतो !

जे महाजन करु शकत नाही, ते मी करु शकतो !

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

बीएचआर प्रकरणात (BHR case) अ‍ॅड. प्रवीण चव्हाण (Adv. Praveen Chavan) यांच्याकडून न्यायालयात (court) कामकाज सुरु असतांना वेळेवर अहवाल सादर करीत नव्हते तर कधी कामकाजाला हजर राहत नव्हते. त्यामुळे न्यायालयाने नाराजी देखील व्यक्त केली होती. दरम्यान, जे काम गिरीश महाजन (Girish Mahajan) करु शकत नाही ते मी करु शकतो असे म्हणत अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी सूरज झंवर यांच्यावर दबाव आणला असल्याचा युक्तीवाद जिल्हा सरकारी वकील (District Public Prosecutor) अ‍ॅड. सुरेंद्र काबरा यांनी न्यायालयसमोर मांडला.

- Advertisement -

बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर यांना मदतीच्या बदल्यात त्यांच्याकडून 1 कोटी 22 लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या अ‍ॅड. चव्हाण यांच्यासह लेखापरिक्षक शेखर सोनाळकर यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सोमवारी न्या. जे. जे. मोहीते यांच्या न्यायालयात कामकाज झाले. यावेळी बचाव पक्षाने केलेल्या युक्तीवाद जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. काबरा यांनी खोडून काढला. त्यांनी या गुन्ह्यातील कलमांची तरतूद व त्या आधारे सूरज झंवर यांनी दिलेल्या फिर्यादीतील मजकूर यांचा कसा संबंध आहे. ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. उच्च न्यायालयाने सुनिल झंवर यांना जामीन देतांना मत नोंदविले असून त्याची ऑर्डर अ‍ॅड. काबरा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. सायंकाळपर्यंत युक्तीवाद पुर्ण न झाल्याने मंगळवारी सकाळी 11 वाजता सरकारपक्षातर्फे युक्तीवाद केला जाणार आहे.

पोलीस उपायुक्तांच्या स्वाक्षरीने सादर केला अहवाल

बीएचआर सारख्या महत्वाच्या गुन्ह्यात अ‍ॅड. चव्हाण यांनी विलंब करणे उचित नव्हते. तसेच पोलिसांच्या अहवालावर स्वाक्षरी करीत नसल्याने पोलीस उपायुक्त पुणे यांच्यासहीने अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला असल्याचे अ‍ॅड. काबरा यांनी युक्तीवादा दरम्यान न्यायालयासमोर मांडले.

सोनाळकर नागपूरला असल्याचा मुद्दा खोडला

खंडणीचा गुन्हा घडलेल्या वेळेस दि. 20 नोव्हेंबर 2021 ते दि. 26 नोव्हेंबर 2021 दरम्यान तत्कालीन लेखापरीक्षक शेखर सोनाळकर नागपुरला होते. हा मुद्दा जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. सुरेंद्र काबरा यांनी खोडून काढला. तसेच फिर्यादीमध्ये अ‍ॅड. चव्हाण पुण्यात आहेत असे कोठेही आढळून आले नसल्याचे त्यांनी न्यायासमोर युक्तीवाद करतांना सांगितले.

अ‍ॅड. चव्हाणांच्या वागणुकीबद्दल स्टेशन डायरीला नोंद

अ‍ॅड. चव्हाण यांच्या वागणुकीबद्दल डेक्कन पोलीस ठाण्याच्या निरीक्षक तपासधिकारी सुचिता खोकले यांनी स्टेशन डायरीला नोंद घेवून याबाबत वरिष्ठांना कळविले होते. यामध्ये सुनिल झंवर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमार्फत पुण्यातील विशेष न्यायालयात दाखल अर्जामध्ये त्याचा उल्लेख आहे.

पैशांसाठी केली जात होती अडवणूक

उच्च न्यायालयात तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी सूरज झंवर व सुनिल झंवर यांच्याविरुद्ध बाजू मांडतांना खोटी बाजू कथन केली त्याचा उल्लेख उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात घेतला आहे ते न्यायालयालसमोर मांडले. तसेच झंवर यांच्यावर मानसिक दबाव कसा करता येईल त्या अनुषंगाने अ‍ॅड. चव्हाण यांनी काय कारवाई केली ते अ‍ॅड. काबरा यांनी युक्तीवादातून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. अ‍ॅड. चव्हाण यांना पैशांसाठी अडवणुक करायची होती म्हणून त्यांनी त्यांचा ज्युनिअर मोहीत माहिमतूरा याच्या माध्यमातून मद्य व्यावसायीक उदय पवार यांचा मोबाईल क्रमांक झंवर यांच्यापर्यंत पोहचविल्याचे त्यांनी युक्तीवाद करतांना मांडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या