पूर्वीच्या काळी राजेरजवाडे व संस्थानिकांना आपली रत्न आणि अलंकाराची हौस पुरविण्याच्या हेतूने अथवा सर्व नवग्रहांची कृपा राहावी या उद्देशाने अथवा कोणते रत्न धारण करावे याबाबतचा निर्णय पक्का न झाल्याने नवरत्नांच्या अंगठीचा उदय झाला असावा असे वाटते. नवरत्नांच्या अंगठीत एकूण नऊ रत्ने असतात. ही अंगठी कशी तयार केली जावी यासाठी मुहूर्त ग्रंथात खालील प्रमाणे दिशानिर्देश देण्यात आलेले आहे.
वज्रं शुक्रेब्जे सुमुक्ता प्रवालं भौमेगो गोमेदमार्को सुनीलम्।
केतौ वैदरूय गुरौ पुष्पकं ज्ञे पाचि: प्राड्मेाणिक्यमर्के तु मध्ये।
याचा भावार्थ असा कि नवरत्नांची अंगठी बनविताना शुक्राच्या प्रसन्नतेसाठी पूर्व भागात हिरा,चंद्राचा मोती आग्नेय दिशेस,दक्षिणेस मंगळाचे पोवळे,नैऋत्य दिशेला राहूचा गोमेद,पश्चिमेस शनीचा सुंदर नीलम,वायव्य दिशेला केतूचा लहसुनिया, उत्तरेला गुरूचा पुष्कराज,ईशान्येस बुधाचा पाचू,अंगठीच्या मध्ये सूर्याचे माणिक्य. या प्रमाणे ही ग्रहमालिका सूर्याभोवती बसविली जाते. सर्वच रत्ने लहान आकाराची व वजनाची असतात. मोठ्या रत्नांची निवड केल्यास नवरत्न अंगठीची घडण होणे शक्यच होणार नाही. नवरत्नांची अंगठी सोन्यामध्ये घडवल्यास जास्त लाभदायक असते.सोन्यामध्ये जमत नसल्यास चांदी मध्ये सुद्धा घडवून धारण करता येते. जन्मकुंडलीतील ग्रह उच्चीचे,स्वराशीचे व शुभभावात पडलेले असतील तर नवरत्नांची अंगठी धारण केल्याने त्या व्यक्तीला ती शुभफलदायक ठरते.
भारतीयांची अशी श्रद्धा आहे की नवरत्नांची अंगठी धारण केल्याने व्यक्ती रोगापासून मुक्त होते,दीर्घायुष्याचा लाभ होतो तसेच संकटांपासून तिची सुटका होते.ही अंगठी धारण केल्यास सुख,संपत्ती, यश,मान,प्रतिष्ठा, सौभाग्य,पुत्रलाभ, प्रापंचिक आणि मानसिक सुखाचा चांगल्या प्रकारे लाभ होतो. नवरत्नांची अंगठी नेहमी उजव्या हाताच्या अनामिका बोटात धारण करावी. नवरत्नांच्या अंगठीचा फायदा उच्चपदस्थ व्यक्ती,अभिनेते,कंपनीचे मालक,मुख्य कार्यकारी अधिकारी, राजनेता यांना जास्त प्रमाणात होतो कारण नवरत्नांचा दरबार सांभाळायला राजासारख्या व्यक्ती हव्या असतात हे मात्र तितकेच खरे ! नवरत्न अंगठीतील सर्वच रत्ने नैसर्गिक व निर्दोष असणे आवश्यक आहे. कुंडलीचा अभ्यास करूनच नवरत्नांची अंगठी धारण करणे लाभदायक ठरते.
नवरत्नांची अंगठी घालताना कोणत्या नियमांचे पालन करावे ?

ताज्या बातम्या
Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...
नाशिक | Nashik
महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...