Tuesday, March 25, 2025
Homeभविष्यवेधशुभ लाभासाठी मुख्य दरवाजावर कोणत्या गोष्टी कराव्या ?

शुभ लाभासाठी मुख्य दरवाजावर कोणत्या गोष्टी कराव्या ?

चांगले भाग्य कोणाला नको असते आणि भाग्याची साथ मिळविण्यासाठी लोक वाट्टेल ते उपाय करत असतात. पण वास्तूमध्ये भाग्याची साथ मिळवण्यासाठी अतिशय सोप्या टिप्स देण्यात आल्या आहेत. वास्तूमध्ये असे मानले जाते की, जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छता नसेल किंवा बुट आणि चप्पल विखुरलेल्या असतील तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश थांबतो. वास्तूसंबंधी हे उपाय केल्यास आणि मुख्य प्रवेशद्वारावर या गोष्टी लावल्यास भाग्य साथ देण्यास सुरवात करते.

या गोष्टी कोणत्या ते पाहूया…

मंगल कळस – कळस हे आर्थिकतेचे म्हणजेच संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अध्यात्मिक दृष्टिकोनातून, हे शुक्र आणि चंद्राचे प्रतीक आहे आणि गणेशाच्या रूपात त्याची पूजा केली जाते. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर दररोज कळस भरून ठेवल्यास गणेशाच्या कृपेने शुभ लाभ मिळतो. लोटा किंवा कळस जे काही ठेवाल त्याचे तोंड रुंद असावे. दररोज सकाळी आंघोळीनंतर कळस पूर्ण भरून ठेवा आणि त्यात गुलाबाच्या पाकळ्याही टाकू शकता. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा तुमच्या घराकडे आकर्षित होते. हे पाणी दररोज बदलले पाहिजे.

तोरण लावणे – कोणत्याही शुभ कार्यापूर्वी किंवा सणाच्या आधी असे म्हणतात की, तोरण लावल्याने तुमच्या घरातील सर्व शुभ कार्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरक्षितपणे पूर्ण होतात. आंब्याची पाने उत्तम असून अशोकाच्या पानांपासूनही हे तोरण बनवता येतात. वास्तूमध्ये असे मानले जाते की सणांव्यतिरिक्त प्रत्येक मंगळवारी घरात तोरण लावल्यास खूप शुभ परिणाम प्राप्त होतात.

चिनी नाणी – फेंगशुईमध्ये मुख्य दरवाजावर चिनी नाणी लावणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते असे म्हणतात. तीन चिनी नाणी एका लाल दोरीत बांधा आणि घराच्या आतील बाजूच्या मुख्य दरवाजाच्या हँडलवर ठेवा. असे केल्याने तुमच्या घरात पैसा जमा होण्याचे प्रमाण वाढते आणि लोकांच्या हातून होणारा अनावश्यक खर्च थांबतो.

स्वस्तिक सर्वात शुभ – मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला लाल, पिवळा किंवा निळा स्वस्तिक बनवावा. किंवा तुम्हाला हवे असल्यास बाजारातून बनवलेले स्वस्तिक आणून मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावू शकता. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लाल स्वस्तिक लावल्याने घरातील वास्तू आणि दिशा दोष दूर होतात. दुसरीकडे मुख्य दरवाजाच्या अगदी वर मध्यभागी निळा स्वस्तिक लावल्याने घरातील लोक वाईट नजरेपासून दूर राहतात.

मूर्ती किंवा चित्र – मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवण्यापूर्वी काही नियम जाणून घेणे गरजेचे आहे. असे म्हणतात की, ज्या बाजूला गणेशाचे पोट असते तिथे समृद्धी असते आणि ज्या बाजूला पाठ विसावते तिथे गरिबी असते. म्हणून जेव्हा जेव्हा मुख्य दरवाजावर गणेशजी ठेवाल तेव्हा त्यांना आतल्या बाजूला ठेवा. बाहेर लावल्याने तुमच्या घरावर विपरीत परिणाम होतो आणि घरात गरिबी वाढू लागते. ही दक्षता घेतल्यास भाग्याची योग्य साथ मिळेल अशी मान्यता आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...