Sunday, October 6, 2024
Homeदेश विदेशWhatsappची 'ती' निळ्या जांभळ्या रंगाची रिंग म्हणजे काय ?

Whatsappची ‘ती’ निळ्या जांभळ्या रंगाची रिंग म्हणजे काय ?

सध्या व्हाटसअ‍ॅपच्या (Whatsapp) युजर्सला काही दिवसांपासून इंटरफेसमध्ये एक निळ्या जांभळ्या रंगाची रिंग दिसत आहे. त्यामुळे युजर्सचा थोडासा गोंधळ उडालेला दिसत असून अनेकांना असे वाटते की नकळतपणे कुठले तरी ऍप इनस्टॉल झालेले आहे. तर काहींनी ते एका भीतीपोटी अनइन्स्टॉल करण्याचाही प्रयत्न केला असेलच.

परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला असेल कारण ते अजिबात अनइन्स्टॉल होत नाही. हे कोणतेही नवीन अ‍ॅप नसून मेटा एआय नामक व्हाटसअ‍ॅपचेच लेटेस्ट फीचर आहे. मेटा म्हणजेच फेसबुकने नुकतेच भारतातील फेसबुक, व्हाटसअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम युजर्ससाठी मेटा एआय लाँच केलेले आहे. परंतु ज्या युसर्सला मेटा एआय दिसत नसेल त्यांनी व्हाट्सअपचे लेटेस्ट व्हर्जनवर इनस्टॉल करून घ्यावे

- Advertisement -

तर या मेटा एआयचा हा उहापोह…. अनेकांना चॅटजीपीटी किंवा गुगल जेमिनी ठाउक आहेच त्यांना जनरेटीव एआय असिस्टंटची कल्पना असणारच. मेटा एआय हा तसाच जनरेटीव्ह रिस्पॉन्स असून तो युजर्सना फेसबुक, व्हाटसअ‍ॅप किंवा इन्स्टाग्राम वापरत असताना अ‍ॅपमधून बाहेर न जाताच हवी ती माहिती पाहिजे त्या स्वरुपात मिळवणे, प्लॅनिंग, सल्ला, सजेशन, शिफारशी, काल्पनिक इमेजिस तयार करणे आदी असंख्य कामे काही सेकंदात पूर्ण करतो.

कसा आहे मेटा एआय

मेटा एआय साठी नवीनतम लियामा 3 टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे . व्हाटसअ‍ॅपवर मेटा एआय वापरन्याकरिता निळ्या जांभळ्या रिंगवर टॅप केल्यानंतर एका नवीन चॅट बॉक्समध्ये डायव्हर्ट केले जाते आणि त्याच ठिकाणी आपला माहितीपूर्ण संवाद सुरु होईल .

उपयोग काय?

  • याद्वारे कोणतीही माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्च करण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • मेटा एआयचे सर्वात लोकप्रिय फीचर म्हणजे इमॅजिन ज्याचा वापर करुन युजर एआय जनरेटेड प्रतिमा तयार करुन त्या इतर व्हाटसअ‍ॅप युजर्सशी शेअर करु शकणार आहे .

हे मेटा एआयचे फिचरचे चॅटजीपीटी आणि गुगल जेमिनीपुढे खूप आव्हान असेल, ज्यांचे इमेज जनरेशन प्राथमिक अवस्थेत आहे. याचा वापर करण्यासाठी मेटा एआयच्या चॅट बॉक्समध्ये फक्त इमॅजिन हा शब्द टाईप किंवा उच्चारुन इमेज प्रॉम्प्ट द्यावे लागतील.

सध्या भारतात मेटा एआय फक्त इंग्लिश भाषेत उपलब्ध असून लवकरच ते चॅट जीपीटी आणि गुगल जेमिनीप्रमाणे भारतीय भाषांमध्येही वापरता येईल. व्हिडिओ कॉल या फिचर नंतर मेटा एआय हे फीचर व्हाटसअ‍ॅपच्या इव्होल्यूशनमधील एक महत्वाचे वैशिष्ट्यपूर्ण फिचर असून तो युजर्ससाठी अमर्याद शक्यता घेउन आले आहे. थोडक्यात, मेटा AI, किंवा मेटा-शिक्षण, हे क्षेत्र आहे ज्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्याचा मुख्य ध्येय आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या