Friday, May 3, 2024
Homeनाशिकनव्या रुग्णालय इमारतीचा ताबा कधी मिळणार?

नव्या रुग्णालय इमारतीचा ताबा कधी मिळणार?

खेडगाव | संदीप गुंजाळ | Khedgaon

गट हा राजकीय दृष्ट्या प्रमुख मानला जातो. खेडगाव (khedgaon) गटातून अवघ्या विधानसभेच्या हालचाली चालतात, हे देखील तितकेच खरे ! खेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला (Primary Health Center) नवीन इमारत (new building) मिळाली परंतू ती आजतगायत पूर्ण न झाल्याने ती कामकाजासाठी ताब्यात मिळाली नाही. त्यामुळे मागील दोन वर्षापासून येथे प्रसुती व कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया (Maternity and family planning surgery) होत नाही.

- Advertisement -

त्याचबरोबर दोन वर्षापासून नव्याने आधुनिक इमारतीचे काम चालू असले तरी ते आजही पुर्णत्वास न आल्याने त्या नवीन इमारतीचा ताबा मिळणार केव्हा ? असा सवाल उपस्थित होत आहे. लवकरात लवकर राहिलेले काम पूर्ण करुन येथे सर्व सामान्य नागरिकांची प्रसुती व कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी (Maternity and family planning surgery) होणारी गैरसोय दुर करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

खेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची अतिशय दयनिय अवस्था झाल्याने ती इमारत निर्लेखित करुन त्याच जागेवर नवीन इमारतीचे बांधकाम जवळपास दोन वर्षापासून सुरु आहे. त्यामुळे तेथील प्रसुती व कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया बंद झाले असले तरी पर्यायी व्यवस्था म्हणून वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना पाठवण्यात येते.

परंतू परिसरातील रुग्णांना ते गैरसोयीचे ठरत असल्याने आपल्याच आरोग्य केंद्रात सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बाह्य रुग्ण तपासणी कक्ष नसल्याने वैद्यकिय अधिकार्‍यांच्या निवासस्थानात रुग्ण तपासणी केली जाते. विद्यमान सरपंच दत्तात्रय पाटील व तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे (Zilla Parishad Member Bhaskar Bhagre) यांच्या पाठपुराव्यामुळे खेडगाव प्राथमिक आरोग्य केेंंद्राला (Primary Health Center) सुसज्ज अशी इमारत मिळाली असून नक्कीच सर्वांना त्याचा आनंद होत आहे. आपल्याला आता येथेच सेवा मिळतील, अशी आशा सर्वांना लागली आहे. परंतू मागील दोन वर्षापासून सुरु असलेले काम आजही विद्यूत जोडणी, नळ कनेक्शन जोडणी आदी कामे अपूर्ण असल्याने त्या इमारतीचा ताबा प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळत नसल्याने ही इमारत असुन नसल्यासारखे वाटत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन इमारतीची आवश्यकता असल्याने नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. परंतू ते काम कासवगतीने सुरु असल्याने अद्यापही ती इमारत पूर्णत्वास येऊन त्याचा ताबा खेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला नाही हे विशेष ! सर्व सामान्य जनतेची अडचण लक्षात घेऊन या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतू त्याची शाश्वती आज सुरु असलेल्या कामावरुन दिसत नाही. तेव्हा लवकरात लवकर राहिलेले काम पूर्ण करुन या इमारतीचा ताबा प्रशासनाला द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. खेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची एकुण 38500 इतकी लोकसंख्या आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाच उपकेंद्र येत असून त्या अंतर्गत खेडगाव, शिंदवड, बोपेगाव, तीसगाव, तळेगाव, सोनजांब, मावडी, संगमनेर, जोपूळ, जऊळके वणी, धामणवाडी, गोंदेगाव, चिंचखेड आदी गावे येतात. यापैकी चिंचखेड व जोपूळ येथील उपकेंद्राच्या इमारती सुस्थितीत असून तीसगाव, मावडी व खेडगाव येथील उपकेंद्र निर्लेखित आहे. वैद्यकीय अधिकारी 2, प्रयोगशाळा तंज्ञ 1, आरोग्य सेवक 5, आरोग्य सेविका 6, आरोग्य सहाय्यक 3, शिपाई 4 असे एकुण 21 कर्मचारी असून आरोग्य सेवक 2, आरोग्य सेविका 1 व शिपाई 2 अशी पाच पदे आजही रिक्त आहेत.

या प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असले तरी सध्याला दोन्हीही वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय रजेवर असल्याचे समजते. दोन्हीही वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याने इतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकार्‍यांना अतिरीक्त पदभार देण्यात येते. अतिरीक्त भार हा त्या प्रभारी वैद्यकीय अधिकार्‍यांसाठी त्रासदायकच ठरते. तरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी याविषयी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आवश्यक

खेडगाव म्हटले की तालुक्यातील एक प्रमुख गाव म्हटले जाते. तालुक्याचे नेतृत्व खेडगाव गटातून चालते, असे म्हटले तरी हे वावंगे ठरणार नाही. खेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला आधुनिक पध्दतीची सुसज्ज इमारतीची पुर्तता करुन नक्कीच ते खेडगावला शोभनिय दिसते. परंतू त्याचे कासव गतीने सुरु असलेले काम व त्यामुळे खेडगावच्या जनतेंना मिळणार्‍या सुविधांमध्ये होणारी गैरसोय ही नक्कीच अशोभनिय आहे.

सध्या तेथे दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असले तरी एक वैद्यकीय अधिकारी प्रसुती रजेवर तर दुसर्‍या वैद्यकीय अधिकारी इतर वैद्यकीय रजेवर असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या तेथे अतिरीक्त पदभार तालुक्यातील इतर वैद्यकीय अधिकार्‍यांकडे दिला असून जनतेला सेवा देण्याचे काम सुरु असले तरी असे किती दिवस चालणार ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या दृष्टीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी वेळीच दक्षता घेऊन खेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्वत: चा कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी प्राप्त होईल, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

खेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण होवून त्याचा ताबा मिळण्यासाठी सरपंच दत्तात्रय पाटील व आम्ही पाठपुरावा करीत असून लवकरच ती ताब्यात मिळेल व जनतेला सुविधा मिळतील. तसेच इमारतीबरोबरच आतील फर्निचर व इतर वस्तू तसेच कर्मचार्‍यांचे निवासस्थाने यासाठी ना. नरहरी झिरवाळांकडून निधी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यात लवकरच यशस्वी होवू.

– भास्कर भगरे, माजी जि. प.सदस्य

खेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत ताब्यात मिळाली नसल्याने सध्या प्रसुती व कुटूंब नियोजन शस्त्रक्रियासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत असून त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाते. लवकरच नवीन इमारतीचे काम पूर्ण होवून ती ताब्यात मिळणार आहे. तेव्हा पुन:श्च रुग्णांना येथेच प्रसुती व शस्त्रक्रियेसाठी सोयीसुविधा उपलब्ध होतील.

– डॉ. कल्पेश चोपडे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या