Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याकोणता झेंडा घेऊ हाती?

कोणता झेंडा घेऊ हाती?

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकारणामुळे कुणाचा समर्थक कोण? असे नाट्य सुरु आहे. मात्र यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची तसेच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

- Advertisement -

या पंचवार्षिक मध्ये राज्यातील राजकारणात खूप मोठे बदल कार्यकर्त्यांना बघायला मिळाले. राज्यात सत्तेसाठी भाजपने शिवसेना ठाकरे गटासोबत असलेला घरोबा मोडत राष्ट्रवादीसोबत जाऊन पहाटेचा शपथ विधी उरकला मात्र राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी सदरहू प्रकारास विरोध केल्याने अवघ्या काही दिवसांतच भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार कोसळले. त्यानंतर कुणालाही अपेक्षित नसलेली महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित करण्यात आली. त्यावेळी शिवसेनेच्या एका गटामध्ये तीव्र नाराजी होती.

मात्र पक्ष प्रमुखांच्या आदेशापुढे कुणाचे काही चालले नाही अशातच तब्बल अडीच वर्षे राहिलेल्या या सरकारला एकनाथ शिंदे यांनी सुरुंग लावत शिवसेना फोडली. नंतर शिंदेंनी भाजपसोबत जात सत्ता प्रस्थापित केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम करू शकत नाही असे सांगत सत्ता स्थापित केली होती. सध्या भाजप शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांसह आठ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सध्याच्या पंचवार्षिक मध्ये बर्‍याच कार्यकर्त्यांनी या पक्षातून त्या पक्षात प्रवेश केला. गेल्या वर्षीच महापालिका निवडणुका लागतील, अशी अपेक्षा इच्छुक उमेदवारांना होती. इच्छुकांसोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील जोमाने तयारी सुरु केली होती ज्या इच्छुकांना आहे त्या पक्षात भवितव्य न वाटल्याने त्यांनी दुसर्‍या पक्षात प्रवेश केला. असे करताना बर्‍याच जणांना वादाला देखील सामोरे जावे लागले होते. काहींना टीकेचा सामना करावा लागला होता. अशातच अपेक्षित नसलेली घटना घडल्याने त्यांच्यात संभ्रमावस्था निर्माण झली आहे.

भाजपकडून निवडणूक लढण्याची तयारी असलेल्या इच्छुकाला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्याने उद्या आपला मतदार संघ नक्की कुणाला सुटेल याबाबत तर्क वितर्क सुरु असून दबक्या आवाजात नाराजी सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. याआधी शिवसेनेच्या इच्छुकांमध्ये राष्ट्रवादी आल्याने संभ्रमावस्था आहे. सध्या तरी महापालिका निवडणुका लागतील, अशी काही चिन्हे नसली तरी नेमक्या कोणत्या पक्षातून तयारी करावी हेच समजत नसल्याचे काही इच्छुकांनी बोलून दाखवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या