Wednesday, October 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजतुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात? तेजस ठाकरेंच्या उत्तराची...

तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात? तेजस ठाकरेंच्या उत्तराची सर्वत्र चर्चा

मुंबई | Mumbai
मुंबईतील शिवाजी पार्क आणि सेना भवन परिसरात ११ ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या (CJP Protest) समर्थनार्थ जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे नेते आक्रमक झाले. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यासोबत तेजस ठाकरेही (Tejas Thackeray) सेना भवन परिसरात दाखल झाले. आंदोलनकर्त्यांच्या सुटकेसाठी झालेल्या ठिय्या आंदोलनात तेजस ठाकरे सहभागी झाले होते. पत्रकारांशी बोलताना तेजस ठाकरे यांना दुर्मिळ प्रजातींच्या शोधाबाबत प्रश्न विचारण्यात आला.

तेजस ठाकरे हे विशेषतः वन्यजीव संशोधन आणि जैवविविधतेशी संबंधित संशोधनासाठी ओळखले जातात. आदित्य ठाकरे यांनी राजकारणात सक्रिय भूमिका घेतली असली तरी तेजस ठाकरे यांची सार्वजनिक प्रतिमा तुलनेने राजकारणापासून दूर राहिलेल्या व्यक्तीची राहिली आहे. पक्षाच्या आंदोलनापासून दूर असणारे तेजस ठाकरे यांनी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलनाला हजेरी लावली. त्यामुळे तेजस ठाकरेंच्या राजकीय सहभागावरुन मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी टीका केली होती.

- Advertisement -

तेजस ठाकरे काय म्हणाले?
नवीन प्रजातीचे किडे सापडले असतील म्हणून तेजस ठाकरे शिवाजी पार्कमधील आंदोलनाला आले असतील, असं विधान नितेश राणेंनी केलं होतं. आता नितेश राणेंच्या टीकेला देखील तेजस ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?, असा प्रश्न पत्रकारांनी तेजस ठाकरेंना विचारला. यावर माणसांचे हक्कच दुर्मिळ झाले आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी आलोय, असं तेजस ठाकरेंनी उत्तर दिलं. तेजस ठाकरेंनी दिलेल्या या उत्तराची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नाशिकच्या मातीतून जागतिक व्यासपीठापर्यंत; खासदार राजाभाऊ वाजेंचे मायभूमीत जल्लोषात स्वागत

नितेश राणेंच्या टीकेनंतर पत्रकारांचा तेजस ठाकरेंना सवाल
भाजपचे नेते नितेश राणे यांनी तेजस ठाकरे यांच्या आंदोलनातील सहभागावर टीका केली होती. तेजस ठाकरे हे वन्यजीव संशोधनादरम्यान नव्या प्रजाती शोधण्यासाठी ओळखले जातात. ते शिवाजी पार्कमधील आंदोलनात सहभागी झाल्याने नव्या प्रजातींच्या शोधासाठीच ते तिथे आले असतील, अशा आशयाचे विधान राणे यांनी केले होते.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) आंदोलन पुकारले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेबाबत (SIR) पक्षाने आक्षेप उपस्थित केले आहेत. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला.

मुंबईतील शिवाजी पार्क आणि सेना भवन परिसरात झालेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे सहभागी झाले होते. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ठाकरे बंधूंसह इतर नेत्यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात भूमिका घेतली. आंदोलकांची सुटका करण्याची मागणी करत काही काळ ठिय्या आंदोलनही करण्यात आले.

ताज्या बातम्या