भारत क्रिकेट संघ भारतीय क्रिकेट संघाचा नवीन प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी २२ जूलै २०२४ रोजी श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या संपूर्ण मालिकेत दोन्ही उभय संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ३ टी २० सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे.
या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाने गुरवारी १८ जूलै रोजी आपला अधिकृत संघ जाहीर केला आहे. आता प्रशिक्षक गौतम गंभीरच्या सोबतीला भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफ मध्ये कोणते नवीन शिलेदार सहभागी होणार? त्यांची नावं समोर आली आहेत.
हे ही वाचा : गुलाबी जॅकेटवर अजितदादा पहिल्यांदयाच बोलले; म्हणाले….
श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्ध द्विपक्षीय मालिकेसाठी अद्याप नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर आणि नेदरलँड्स संघाचा माजी खेळाडू रायन टेंडसकाटे हे भारतीय क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये सहभागी होणार आहेत.
क्रिकबझ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार,हे दोन्ही खेळाडू भारतीय क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफचा भाग असतील तसेच क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून टी दिलीप कायम राहणार आहेत. नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज मोरने माॅरकल या जागेसाठी मजबूत दावेदार आहे.
हे ही वाचा : ‘कबड्डी’च्या मैदानात खा. लंके यांची बाजी!
या तिन्ही खेळाडूंनी गौतम गंभीर सोबत आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघासोबत काम केले आहे. भारतीय क्रिकेट संघ सोमवारी २२ जूलै २०२४ रोजी चार्टर्ड फ्लाईट ने मुंबईहून कोलंबो साठी रवाना होणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट संघाचा नवीन प्रशिक्षक गौतम गंभीरची प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआय अनौपचारिक घोषणा करतील.
२२ जूलै २०२४ रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला भारतीय क्रिकेट संघाचा नवीन टी २० कर्णधार सुर्य कुमार यादव उपस्थित राहणार असून, २७ जूलै २०२४ पासून टी २० मालिकेला प्रारंभ होणार आहे.
हे ही वाचा : उद्या लाडकी मेहुणी, लाडका मेहुणा योजना आणतील; मनोज जरांगेंची खोचक टीका
सलिल परांजपे नाशिक.