Monday, April 28, 2025
Homeराजकीयमनसेच्या नगरसेवकावर अजित पवार का भडकले

मनसेच्या नगरसेवकावर अजित पवार का भडकले

पुणे

फिजिकल डिस्टन्स ठेवण्यावरून पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे मनसेचे गटनेते आणि नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. दरम्यान ,एवढीच काळजी होती तर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवलाच कशाला, ऐकूणच घ्यायचं नव्हतं तर निमंत्रण दिलंच कशाला, असा सवाल नगरसेवक सचिन चिखले यांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी अजित पवारांच्या वर्तणुकीवरही नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जम्बो कोविड सेंटरच्या नियोजित स्थळाची पाहणी केली. पिंपरी चिंचवड महापालिकेतील मनसेचे गटनेते व नगरसेवक सचिन चिखले हे प्रशासनाकडून हाताळल्या जाणाऱ्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी अजित पवारांकडे जात होते. त्याचवेळी अजित पवार चिखले यांच्यावर भडकले. “आमचे चार मंत्री पॉझिटिव्ह आले आहेत. लांबून बोल, फिजिकल डिस्टन्स ठेवा,” असं म्हणत अजित पवार यांनी सुनावलं. त्यावर सचिन चिखले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याच दौऱ्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने महापालिकेतील सर्व पक्षाच्या गट नेत्यांनाही आमंत्रित केलं होतं. त्यानुसार आपण प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची माहिती देण्यासाठी, कोरोनाबाधितांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती देण्यासाठी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हेही उपस्थित होते. मात्र अजित पवारांनी एकूण घेणं तर दूरच उलट एकेरी उल्लेख करत आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचं म्हणत मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी अजित पवारांच्या वर्तवणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Central Government Decision : केंद्र सरकारचा पाकिस्तानला दणका; १६ यूट्यूब चॅनेलवर...

0
नवी दिल्ली | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारताकडून (India) पाकिस्तान विरूद्ध विविध स्तरांवर कारवाई सुरू आहेत. अशातच आता भारत सरकारच्या गृह...