Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशमहाराष्ट्रात कोरोना का वाढला? केंद्राने दिले हे कारण

महाराष्ट्रात कोरोना का वाढला? केंद्राने दिले हे कारण

नवी दिल्ली

देशात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण कमी होत असतांना महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढले आहे. यामुळे राज्य सरकारबरोबर केंद्राचे टेन्शन वाढवले आहे. सध्य्या देशातील सर्वात जास्त अँक्टिव्ह कोरोना रुग्णही महाराष्ट्रातच आहेत.

- Advertisement -

चांगली बाब म्हणजे राज्यात कोरोना वाढला असला तरी नवा स्ट्रेन दिसून आला आहे. मग अचानक कोरोना रुग्ण कसे वाढत आहे, यामागील नेमके कारण काय आहे? हे जाणून घेतल्यावर त्यासाठी नवा व्हायरस नव्हे तर तुम्हीच जबाबदार आहात, असे म्हणत केंद्र सरकारने महाराष्ट्रावर ताशेरे ओढले आहेत.

सध्या देशात जवळपास १ लाख ९० हजार अॅक्टिव्ह कोरोना केसेस आहेत. केरळमध्ये अॅक्टिव केसेस कमी होत असताना महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण दुपटीने वाढले आहे. महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह केसेस असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे फक्त महाराष्ट्रातच आहेत.देशातील एकूण नव्या कोरोना प्रकरणांपैकी तब्बल ८६ टक्के प्रकरणे महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडूत या राज्यांतील आहेत.सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांबाबत महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, गुजरात, हरयाणाचा क्रमांक लागतो.

हे आहेत कारण…

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, महाराष्ट्राची परिस्थिती खूप वाईट आहे. हा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा परिणाम नाही. तर कमी प्रमाणात टेस्टिंग , ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगमध्ये कमतरता आणि कोरोना नियमांचं उल्लंघन, बेजबाबदारपणा हेच यासाठी कारणीभूत आहे.

बेजबाबदार राहू नका

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल म्हणाले, महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या नव्या प्रकरणांमुळे आता चिंता वाढली आहे. ही खूप गंभीर परिस्थिती आहे. आपल्याला यातून दोन गोष्टी शिकायला हव्यात. एक म्हणजे व्हायरसबाबत बेजबाबदार राहू नका आणि दुसरं म्हणजे जर आपल्याला कोरोनामुक्त राहायचं असेल तर कोरोना नियमांचं पालन करावंच लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या