मंदिरात प्रवेश करताना भाविक घंटी वाजवून मगच गाभार्यात जातात. मंदिरात गेल्यानंतर घंटी वाजवण्यामागे आध्यात्मिक आणि धार्मिक पैलु आहेत. पण तुम्हाला माहितीये का मंदिरातील घंटीबाबत वास्तुशास्त्रातही काही नियम सांगितले आहेत. वास्तुशास्त्रात मंदिरातील घंटीचा संबंध सकारात्मक उर्जेशी जोडला गेला आहे. वास्तुशास्त्रानुसार, मंदिरातील घंटा ही सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे. अनेकांना फक्त इतकंच माहिती असते की मंदिरात गेल्यानंतर घंटी वाजवून मगच गाभार्यात प्रवेश करावा. पण काही जण मंदिरातून बाहेर पडतानादेखील घंटी वाजवतात. पण, वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचे आहे. मंदिरातून बाहेर पडताना कधीच घंटी वाजवू नये,
याचे कारण काय जाणून घेऊया
मंदिरात घंटी का वाजवतात ?
ध्वनीचा संबंध उर्जेशी जोडून बघितला जातो. असं म्हणतात की, जेव्हा पण मंदिरात गेल्यानंतर घंटी वाजवली तेव्हा, त्या नादामुळं आसपास असलेल्या लोकांमध्ये उर्जा निर्माण होते. वास्तुशास्त्राबरोबरच स्कंदपुराणातही त्यांचा उल्लेख आढळतो.
ध्वनी- जेव्हापण कोणी मंदिरातील घंटी वाजवतो तर येणारा ध्वनी खूपच शुद्ध आणि सकारात्मक उर्जेशी जोडला जातो. त्यामुळं मंदिरात प्रवेश करत असताना घंटी वाजवली जाते.
वैज्ञानिक कारण- घंटी वाजवण्यामागे एक वैज्ञानिक कारणदेखील आहे. मंदिरातील घंटी वाजवल्यानंतर त्यातून निर्माण होणार्या आवाजामुळं वातावरणात तेज कंपन निर्माण होते. त्यामुळं आसपास असलेले जिवाणी-विषाणु नष्ट होतात. त्यामुळं वातावरण शुद्ध करण्यासाठी मंदिरात घंटी वाजवली जाते.
मंदिरातून बाहेर निघताना घंटी वाजवली पाहिजे का ?
अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की, मंदिरातून बाहेर पडताना पुन्हा घंटी वाजवली पाहिजे का? अनेकजण हा विचार न करताच घंटी वाजवून मंदिरातून बाहेर पडतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार, मंदिरातून बाहेर निघताना घंटी वाजवली नाही पाहिजे. त्यामुळं मंदिरातील सकारात्मक उर्जेचा भंग होतो व तुम्हाला मिळालेली सकारात्मक उर्जादेखील तुम्ही तिथेच सोडून बाहेर येता. त्यामुळं मंदिरातून निघताना कधीच घंटा वाजवू नये, असं शास्त्रात सांगितले आहे.
मंदिरातून बाहेर निघताना घंटा का वाजवत नाहीत ?

ताज्या बातम्या
RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेचा कोट्यवधी भारतीयांना दिलासा; रेपो रेटमध्ये...
मुंबई | Mumbai
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सुरु केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफच्या आक्रमक अंमलबजावणीमुळे भारतीय शेअर बाजारात दोन दिवसांपूर्वी हाहाकार उडाला होता....