घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…
स्कॉलर किंवा हुशार विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. काही विद्यार्थी मात्र परीक्षा जवळ आली की रात्रंदिवस अभ्यास करतात पण स्कॉलर मुलांच्या तुलनेत त्यांना कमी गुण पडतात. कोणत्याही शाखेची पदवी घेतल्यानंतर चइअ ( इरलहशश्रेी ेष लेााशीलश) करता येते. चइअ ही दोन वर्षांत मिळणारी उपयुक्त डिग्री आहे. कोणत्याही शाखेत पदवी मिळवल्यानंतर एमबीएची पदवी घ्यायची असेल तर त्यासाठी चांगली संस्था निवडली पाहिजे. घरची आर्थिक परिस्थिती चांगली असेल व शिक्षणावर अधिक पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर परदेशातही एमबीए करता येते. एमबीए चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर प्रयत्नांनी चांगली नोकरी मिळते. आत्मविश्वासाने दिलेल्या मुलाखतीद्वारा चांगली नोकरी मिळते. आपले आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुखकर होणार हे लक्षात आल्यावर समाधान मिळते. आपल्या अंगातील गुणांना योग्य वाव मिळत आहे हे लक्षात आल्यावर मुलांचा आत्मविश्वासही वाढतो. एमबीए या डिग्रीमुळे चांगले यश मिळवून मोठ्या नामांकित कंपन्यांमधे चांगल्यारीतीने यशस्वी झालेल्या मुलांची उदाहरणे मी पाहिली आहेत. योग्य कार्यक्षमतेमुळे बढती लवकर मिळते. उत्कृष्ट कामाच्या जोरावर वरिष्ठ पद मिळू शकते. उच्चपदावर काम करण्यासाठी हार्ड वर्कर हा मोठा गुण अंगी पाहिजे. कंपनीच्या भल्यासाठी व प्रगतीसाठी त्यांचा मोलाचा सहभाग असतो, त्यामुळे पगार व मान या दोन्ही गोष्टी स्वकष्टाने प्राप्त होतात. विश्वासपूर्वक कामातील निर्णय घेतल्यास कंपनीचाही बराच फायदा होतो व त्यांची ही गुणग्राहकता व निर्णयक्षमता कंपनीच्या लक्षात आल्यावर कंपनीत त्यांना मानाचे स्थान मिळते व योग्य पगारवाढ होते.
कंपनीतील कामाबरोबरच वैयक्तिक जीवनातील जबाबदारीही त्यांना पेलायची असते. स्वतःचे कुटुंब व कुटुंबाची प्रगती या गोष्टींकडे वेळ मिळेल तेव्हा लक्ष देऊन त्यांचाही मार्ग सुखकर करायचा असतो. यासाठी मनात जिद्द असावी लागते व ही जिद्द जेव्ह ते मोठ्या पदावर काम करतात तेव्हा स्वअनुभवातून निर्माण होते. अशी सकारात्मक जिद्द माणसाला चांगल्या मार्गावर नेते. कोणत्याही शाखेतील पदवी घेताना विद्यार्थ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी व नोकरीतील स्थिरता महत्त्वाची असते. आर्थिक स्थिरता प्राप्त झाल्यावर जीवनातील पुढील वाटचाल करण्यास यशस्वी पाऊल टाकता येते.