Monday, July 15, 2024
Homeनगरपती देखत पत्नीला दुचाकीवर बसून पळविले

पती देखत पत्नीला दुचाकीवर बसून पळविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

ओळखीच्या व्यक्तीनेच पती देखत पत्नीला दुचाकीवर बसून पळवून नेल्याची घटना शनिवारी (दि. 26) दुपारी तारकपूर परिसरात घडली. याप्रकरणी पतीने तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 27) दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश माणिकराव गावंडे (रा. पिंपरी, ता. आखुड, जि. आकोला) याच्याविरूध्द अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी नगर तालुक्यातील एका गावात पत्नीसह राहतात. ते दोघे नगर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये कामाला असताना त्यांची गावंडे याच्यासोबत ओळख झाली होती. त्यांच्यात वादही झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुढे फिर्यादी व त्यांच्या पत्नीने त्या हॉस्पिटलचे काम सोडले. त्यांच्या कामाचे पैसे हॉस्पिटलकडे बाकी होते. दरम्यान, शनिवारी दुपारी फिर्यादी व त्यांची पत्नी नगर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम पाहण्यासाठी आले होते. तेथे गवांडे याची भेट झाली.

तुमचे हॉस्पिटलमधील कामाचे पैसे काढून देतो, असे म्हणून पती-पत्नीला त्याच्या दुचाकीवर बसून नेले. तारकपूर परिसरात गेल्यानंतर त्याने दोघांना दुचाकीच्या खाली उतरून दिले. त्याने फिर्यादीला मारहाण केली व बळजबरीने पत्नीला दुचाकीवर बसण्यास सांगितले. पत्नी दुचाकीवर बसली व ते दोघे तेथून निघून गेले. ज्या हॉस्पिटलमध्ये जायचे होते तेथेही ते मिळन न आल्याने फिर्यादीने तोफखाना पोलीस ठाण्यात पत्नीचे गवांडे याने अपहरण केले असल्याची फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या