Tuesday, March 25, 2025
Homeनगरविजयपूरमध्ये बायकोने काढला नवर्‍याचा काटा

विजयपूरमध्ये बायकोने काढला नवर्‍याचा काटा

अनैतिक संबंधात ठरत होता अडसर || 12 तासांत आरोपी गजाआड

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा त्याच्या पत्नीने व तिच्या प्रियकराने मिळून खून केला होता. या गुन्ह्यातील आरोपींना शेवगाव पोलिसांनी 12 तासांच्या आत गजागाड केले आहे. तालुक्यातील विजयपूर गावामधील अनिल जगदाळे व त्याची प्रियसी या दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबंध होते. मात्र, यात पती अडसर ठरत होता. त्यांच्या प्रेमाच्या मार्गातील काटा कायमचा काढण्यासाठी पती ज्ञानेश्वर जाधव (वय 32 वर्षे, रा. विजयपूर, ता. शेवगाव) यास त्याच गावातील आरोपी अनिल जगदाळे (वय 23 वर्षे) याने डोक्यात, हातावर, छातीवर लोखंडी गजाने मारहाण करून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार केले.

- Advertisement -

याप्रकरणी मयत ज्ञानेश्वर जाधव यांचे वडिल पांडुरंग जाधव यांनी दोघांविरुध्द शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून वेगवेगळी दोन पोलीस पथके बिडकीन, पैठण व छत्रपती संभाजीनगर भागात रवाना केली. तसेच आरोपी व त्याची प्रियसी असे दोघांना पोलीस पथकाने ताब्यात घेवून गुन्ह्याविषयी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने खुनाच्या गुन्ह्यात कबुली दिली. एका आरोपीस काही तासांतच तसेच इतर साथीदार (प्रेयसी) आरोपी यांना 12 तासांच्या आत अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान नागरे, धरमसिंग सुंदरडे, अमोल पवार, निलेश म्हस्के, नितीन भताने, किशोर काळे, संभाजी धायतडक, शाम गुंजाळ, संतोष वाघ, राहुल खेडकर, प्रशांत आंधळे यांनी केली असुन तपास समाधान नागरे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...