Friday, May 16, 2025
Homeधुळेक्षुल्लक कारणावरून पत्नीची हत्या, पतीला अटक

क्षुल्लक कारणावरून पत्नीची हत्या, पतीला अटक

धुळे । Dhule। प्रतिनिधी

- Advertisement -

साक्री तालुक्यातील पेरेजपूर येथे क्षुल्लक कारणावरून (trivial reason) तीक्ष्ण हत्याराने वार करीत पत्नीची हत्या (Wife killed) करण्यात आली. काल दुपारी ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी पतीवर (husband) गुन्हा नोंद झाला असून त्याला पोलिसांनी अटक (arrested) केली आहे.

मिनाबाई राजेंद्र सोनवणे (वय 42 रा. पेरेजपूर) असे मयताचे नाव आहे. तिचे पती राजेंद्र शिवा सोनवणे (वय 50) यांच्यासोबत नेहमीच किरकोळ कारणावरून वाद होत होते. काल देखील गावातील वामन गबा मोरे यांच्या पडीक शेतात दोघांमध्ये वाद झाला.

त्यातून राजेंद्र याने कोणत्यातरी तिक्ष्ण हत्याराने पत्नी मिनाबाई हिच्या डोक्यावर वार करीत तिचा खून केला. त्यानंतर गावात निघून गेला. याप्रकरणी बंडू शंकर निकम (रा. अष्टाणे) यांच्या तक्रारीवरून राजेंद्र सोनवणे विरोधात साक्री पोलिसात भांदवि कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अजयकुमार चव्हाण हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...