Friday, November 22, 2024
Homeदेश विदेशमोदींच्या शपथविधी सोहळ्याला बिबट्याची हजेरी? व्हायरल व्हिडीओने सोशल मिडीयावर खळबळ

मोदींच्या शपथविधी सोहळ्याला बिबट्याची हजेरी? व्हायरल व्हिडीओने सोशल मिडीयावर खळबळ

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने ९ तारखेला सायंकाळी राष्ट्रपती भवनात एका भव्य समारंभात शपथ घेत नवे सरकार स्थापन केले. या कार्यक्रमाला ६ हजाराहुन अधिक लोकांनी हजेरी लावली. मात्र, राष्ट्रपती भवनातील शपथविधी सोहळ्याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने इंटरनेटवर चर्चेला उधाण आले आहे.

या व्हिडिओमध्ये मंत्री दु्र्गादास उइके शपथ घेताना दिसत आहेत. यावेळी मागे पायऱ्याजवळ एका प्राणी चालताना दिसत आहे. हा प्राणी नेमका कोणता आहे, यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. अनेकांना हा प्राणी बिबट्या वाटत आहे. शपथविधीवेळी तो मंचामागे असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या पायऱ्यांजवळून ऐटीत चालत जात होता. मात्र हा प्राणी कॅमेऱ्यापासून खूप लांब असल्यामुळे स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे हा बिबट्याच होता असा दावा करता येणार नाही.

- Advertisement -

अनेकांना व्हिडिओमधील दिसणारा प्राणी बिबट्या असल्याचे वाटत आहे, त्यामुळे अनेकजण राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करत आहेत. खरेच तो बिबट्या असेल तर तो मंचाजवळ का आला नाही, असेही सवाल उपस्थित केले जात आहेत. तसेच राष्ट्रपती भवनातील इतक्या मोठ्या कार्यक्रमात हा प्राणी सहज वावरत होता, यावरून उलटसुलट चर्चा सुरु आहे.

अनेक लोक हा प्राणी बिबट्या असल्याचे सांगत आहेत, तर बरेच लोक याकडे जंगली मांजर म्हणून पाहत आहेत. तर काही लोक या प्राण्याला बॉब कॅट म्हणत आहेत. कॅमेऱ्यात नेमका कोणता प्राणी दिसतोय याची पुष्टी सध्या तरी झालेली नाही.

दरम्यान तिथे एक विचित्र प्राणी फिरताना दिसला. तो एका बाजूने दुसरीकडे जात होता. त्यानंतर हा प्राणी कॅमेऱ्यात कैद झाला. यानंतर या प्राण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या