Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रअचिंबित : चक्क जंगली नीलगाय घुसली घरात

अचिंबित : चक्क जंगली नीलगाय घुसली घरात

पैठण |प्रतिनिधी| Paithan

- Advertisement -

एक नीलगाय (Nilgai) आपल्या कळपातून चुकुन बाहेर गेल्यामुळे आडुळगावच्या पारुंडी तांडा (Parundi tanda) (ता. पैठण) (Paithan) गावात शिरुन सैरावैरा धावू लागली. यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली. नीलगाय (Nilgai) गावातील विकास रामदास चव्हाण यांच्या घरात घुसली. नीलगायीने घरात प्रवेश (Nilgai Home entry) करताच घरातील महिला घराबाहेर पळाल्या. घरात विकास चव्हाण यांची तेरा महिन्याची चिमुकली वैष्णवी घरातच अंथरुणावर खेळत होती. मात्र दैव बलवत्तर असल्याने या नीलगायीने (Nilgai) या चिमुकलीस कोणतीही हानी पोहचवली नाही.

किशोर चव्हाण त्यांच्या पत्नी मंगल चव्हाण या घरातून घाबरून बाहेर जात असताना त्यांच्या कमरेला मार लागला. या घटनेची गावाच्या नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचार्‍यांना फोन वरून माहिती दिली. गावातील नागरिकांनी (Village People) तब्बल पाऊण तासा नंतर त्या चिमुकलीची नीलगाईच्या तावडीतून सुटका केली. घराबाहेर पडताच नीलगायीने गावात धुम ठोकली. त्यामुळे काही काळ गावात मोठी खळबळ उडाली होती.

मोठ्या परिश्रमानंतर नीलगायीला (Nilgai) गावाबाहेर काढण्यात यश आले. नीलगायीने गावात शिरल्यामुळे गावात दहशतीचे वातावरण असून या नीलगाय पासून शेतीचे प्रचंड नुकसान होतेच, पण या प्राण्यांनी आपला मोर्चा आता मानवी वसाहतीकडे वळवला आहे. तब्बल तीन तास मेहनत घेऊन वनविभागाच्या (Forest Department) कर्मचार्‍यांनी तिला पकडले. यावेळी वनविभागाचे मनोज कांबळे, वनरक्षक राजू जाधव, वनरक्षक उमेश मार्कण्डे यांच्यासह गावातील नागरिकांनी पकडण्यासाठी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या