Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याआजारपणाचं कारण देत शिंदेंना हटवून अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा डाव?; 'या' नेत्याने व्यक्त...

आजारपणाचं कारण देत शिंदेंना हटवून अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा डाव?; ‘या’ नेत्याने व्यक्त केली शंका

गडचिरोली | Gadchiroli

एकनाथ शिंदे यांच्या आजारपणाचं कारण देत त्यांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर करण्याचे प्रयत्न आहेत, अशी शंका काँग्रेस नेते आणि विधानसभेचे नवनिर्वाचित विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. शिंदेंना हटवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? असा सवाल वडेट्टीवारांनी बोलून दाखवली. ते गडचिरोली येथे आयोजित पत्रकारपरिषदेत बोलत होते.

- Advertisement -

ते म्हणाले, मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे.परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून याचे खंडन करण्यात आले होते. आज पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात आले आहे. हा सर्व प्रकार भाजपचा डाव असून शिंदेंना आजारी करून अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहे. काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यात याच पार्श्वभूमीवर भेट झाली, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. यावेळी अजित पवार भेटीबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यास लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.

आराम करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का?; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

कोणत्या पालकमंत्र्यांना कोणत्या जिल्ह्याचं ध्वजारोहण करायचं यावरून सरकारमध्ये मतभेद होते. त्यावरही विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण कोण करणार, याचे परिपत्रक निघाले असताना यावर विजय वडेट्टीवार यांनी तिकट प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात हंगामी राज्यपालांची नेमणूक करून ध्वजारोहण करावे, असा खोचक सल्ला त्यांनी भाजप सरकारला दिला आहे.

५ रुग्णांच्या मृत्यूनंतरही प्रशासनाला जाग आली नाही; ठाण्यात रूग्णालयातील १७ जणांच्या मृत्यूनंतर शरद पवारांचे ट्विट

राज्यात २८ कॅबिनेट मंत्री कार्यरत असून नऊ ते दहा जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत. पुणे येथील ध्वजारोहणाचा वाद विकोपाला गेला आणि तिथे राज्यपालांना ध्वजारोहण करायचे आहे असे परिपत्रक निघाले. यापेक्षा दुसरे दुर्दैव असू शकत नाही. ध्वजारोहणासाठी जर वाद होत असतील तर हंगामी राज्यपाल नेमावे, जिथे जिथे ध्वजारोहणाचा वाद आहे तिथे हंगामी राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करावे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. यामुळे राज्याची अस्मिता आणि राष्ट्रीयता धुळीस मिळवण्याचे काम भाजप सरकार करत असून यांना जनता माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या