Friday, May 3, 2024
Homeनगरकाळे-कोल्हेंची सहमती एक्सप्रेस जिल्हा बँकेप्रमाणे इतर निवडणुकामध्ये टिकेल का?

काळे-कोल्हेंची सहमती एक्सप्रेस जिल्हा बँकेप्रमाणे इतर निवडणुकामध्ये टिकेल का?

रांजणगाव देशमुख (वार्ताहर) –

ग्रामपंचायतीचे पडघम वाजायचे आता गाव कारभारी निवडल्याने थांबले आहेत. मात्र तालुक्यातील सहकारी संस्थाच्या लगेच चालु होण्याची

- Advertisement -

चिन्हे असुन जिल्हा बँकेत झालेली काळे कोल्हेंची सहमती एकसप्रेस तालुक्यातील इतर निवडणुकामध्ये टिकेल का याकडे तालुक्याचे लक्ष लागुन आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकित सोसायटी मतदारसंघातुन कोल्हेंच्या तिसर्‍या पिढीचे नेतृत्व करणारे विवेक कोल्हे बिनविरोध निवडुन आले आहेत. तर शेतीपुरक मतदार संघातुन काळेंच्या तिसर्‍या पिढीचे नेतृत्व करणारे आ.आशुतोष काळे बिनविरोध निवडुन आले आहेत. एकमेकासाठी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने आपल्या समर्थकांचे अर्ज माघारी घेत बिनविरोधाचा मार्ग खुला केला. अगोदर विवेक कोल्हे बिनविरोध झाले नंतर आ. आशुतोष काळे बिनविरोध झाले.

यापुर्वीही माजी मंत्री शंकरराव कोल्हे व कै माजी खासदार शंकरराव काळे यांनी अनेक वेळेस सहमतीचे राजकारण केले.कारखान्यात शक्यतो राजकारण येऊ दिले नाही. याचा फायदाही तालुक्याला नक्कीच झाला आहे. काळे कोल्हेंच्या राजकारणाबाबात जिल्ह्यात आल्यानंतर राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काळे कोल्हे यांच्या राजकारणावर भाष्य केलेले आहे. त्यानंत दुसर्‍या पिढीतील माजी आ. आशुतोष काळे व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनीही काही निवडणुकामध्ये सहमती एक्सप्रेस चालविली आहे.आता तिसर्‍या पिढीतही ही सहमती सुरु झाली आहे. काळे कोल्हेंच्या या राजकारणाची नेहमीच राज्यभर चर्चा होत असते. कुठे भांडायचे आणि कुठे थांबायचे हे ठरलेले असते अशी चर्चा नेहमीच होत असते. यात गोष्ट प्रक्रशाने जाणवते ती म्हणजे दोनही कारखाने आज चांगल्या परिस्थितीत आहेत. या कारखान्यांना तालुक्याबाहेरुन उस उपलब्ध करुनही कारखाने चांगले चालविले जातात. तर जिल्ह्यातील काही कारखान्यांना उस तालुक्यात उपलब्ध असतानाही ते मोठ्या आडचणीत आहेत.

तालुक्यात आता दोन्ही साखर कारखान्याच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत. तर गावोगावच्या सहकारी संस्थाच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. बाजार समीतीचीही मुदत आक्टोबर मध्येच संपुन तेथे आता प्रशासक कारभार पाहत आहे. ही निवडणुकही कधीही जाहीर होऊ शकते. कारखान्यांच्या निवडणुकीत सहमती एक्सप्रेस धावेल असा अनेक राजकिय जाणकारांचा अंदाज आहे. दोन्हीकडेही कारखान्यामध्ये बर्‍यापैकी नविन चेहर्‍यांना संधी देण्याची शक्यता आहे. सहकारात राजकारण असु नये या ठिकाणी विकासाचे राजकारण झाले पाहीजे यात कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही परंतु तालुक्यातील सर्वच सहकारी संस्थामध्ये असे होणे गरजेचे आहे. विकास सोसायट्या निवडणुकासाठी सक्षम नाहीत याठिकाणीही बिनविरोधाचे वारे वाहणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या