Sunday, November 24, 2024
Homeब्रेकिंग न्यूजWinter Session of Parliament : उद्या पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

Winter Session of Parliament : उद्या पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्या २५ नोव्हेंबर २०२४, सोमवार पासून सुरू होत आहे. अधिवेशनकाळात सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने येतील. दरम्यान हरियाणा नंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपलाही मोठे यश मिळाले आहे. दोन्ही राज्यांत तसेच लोकसभा निवडणुकीत आणि दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणूकीत विरोधकांनी संविधानाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. त्यानंतर आता मोदी सरकारकडून विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी संविधानाशी संबंधित महत्वाच्या माहितीवर प्रकाशझोत टाकण्यात येईल.

- Advertisement -

हे देखील वाचा – Sharad Pawar : “आमची अपेक्षा होती तसा…”; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरिण रिजिजू यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, उद्यापासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. २६ नोव्हेंबर मंगळवारी राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज होणार नाही. कारण त्यादिवशी संविधान सभेने संविधान स्वीकारले, त्याचे ७५ वे वर्ष आहे. यापार्श्वभूमीवर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल.

हे देखील वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया – निकाल पटला नाही तरी…

संविधान सभागृहात दोन्ही सभागृहातील सदस्य एकत्रित असतील. यादिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सदस्यांना मार्गदर्शन करतील. संविधान दिवशी काही महत्वाची कागदपत्रे पुस्तकातून प्रकाशित केली जातील. संविधान निर्मितीआधी काय-काय प्रक्रिया झाली होती, यांसह अनेक गोष्टींची माहिती यात असेल. हे सामान्य पुस्तक नाही. पुस्तकामध्ये असलेली चित्र, त्याचे वर्णन, मुलभूत संकल्पना, त्याची माहिती देण्यात आली आहे, असे रिजिजू यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया- पुगोगामी महाराष्ट्रासाठी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१५ पासून देशात संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून सातत्याने संविधान दिन साजरा करण्यात येतो. यावर्षीही ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने दिल्लीपासून संपूर्ण देशात हा दिन साजरा करण्यात येईल. केवळ संविधान दिवसापुरता हा कार्यक्रम नसेल. देशभरातील गावागावांत आम्ही संविधान पोहचवणार आहोत, जेणे करून संविधानाची मुलभूत संकल्पना लोकांना माहिती होईल, असे रिजिजू यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या