Sunday, March 30, 2025
Homeनगरचोरीची वीज कट केल्याने दोघा वायरमनला मारहाण

चोरीची वीज कट केल्याने दोघा वायरमनला मारहाण

अहमदनगर (प्रतिनिधी)- चोरीची वीज कट केल्याने दोघा वायरमनला लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना बोल्हेगाव येथे घडली. याप्रकरणी मारहाण करणारे सुनील नारायण तांबे, निरज सुनील तांबे (रा. बोल्हेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन बाळासाहेब बोरूडे (वय- 28 रा. बोल्हेगाव ता. नगर) व रवी बाळासाहेब कराळे हे दोघे वायरमन शुक्रवारी (दि. 29) बोल्हेगाव परिसरात काम करत होते. साडेचारच्या सुमारास भारत बेकरीच्या पाठीमागे चोरून वीज वापरत असल्यांचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यावेळी बोरूडे व कराळे यांनी चोरीची वीज कट केली. वीज कट केल्यामुळे सुनील तांबे व निरज तांबे यांनी दोघा वायरमनला लोखंडी गजाने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बोरूडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुनील तांबे व निरज तांबे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुंडे हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

..तर 1 एप्रिल पासून राहुरी शहर बेमुदत बंद ठेवणार – प्राजक्त...

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनेची घटनेला तीन ते चार दिवस होऊनही पोलिसांनी आरोपींना अद्यापही अटक केलेली नाही. घटनेतील...