अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
लहान मुलांच्या भांडणाच्या कारणातून पाच जणांनी एका महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. सरला सखवारे (वय 35 रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) असे जखमी महिलेचे नाव आहे. गजानन कॉलनीमध्ये ही घटना घडली. जखमी सखवारे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये इंदुबाई शंकर गायकवाड, मिना गोरख काळे, गोट्या (पूर्ण नाव माहिती नाही), सुरेश गोरख काळे, अनिकेत (पूर्ण नाव माहिती नाही) यांचा समावेश आहे. शनिवार, 18 जून रोजी दुपारी दोन वाजता ही घटना घडली असून या प्रकरणी सोमवार 20 जून रोजी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सखवारे व काळे कुटुंबातील लहान मुलांचे भांडण झाले होते. याचा राग मनात धरून काळे कुटुंबाकडील पाच जणांनी सखवारे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक भास्कर मिसाळ करीत आहेत.