Thursday, March 13, 2025
Homeब्लॉगआज जागतिक ब्रेन स्ट्रोक दिवसनिमित्त

आज जागतिक ब्रेन स्ट्रोक दिवसनिमित्त

ब्रेन स्ट्रोकनंतर फिजिओथेरपी महत्त्वाची

स्ट्रोक म्हणजे काय

ब्रेन स्ट्रोक ही न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. ज्यामध्ये मेंदूमध्ये अचानक रक्तस्त्राव होतो. मेंदूला रक्तपुरवठा करणार्‍या वाहिन्या फुटल्यामुळे किंवा मेंदूच्या नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे ब्रेन स्ट्रोकची समस्या उदभवते. देशात सुमारे दरवर्षी १८ लाख लोकांना ब्रेन स्ट्रोकच्या समस्येचा सामना करावा लागतो.त्यामुळे ट्रोकनंतर फिजोओथेरपी महत्वाची ठरते.

- Advertisement -

स्ट्रोकची धोक्याची चिन्हे कोणती असतात?

शरीराच्या एखाद्या भागात सुन्नपणा येणे, डोळ्यांना अस्पष्ट दिसणे अशक्तपणा येणे , चालताना अडखळणे आवाजात फरक पडणे व बोलायला अवघड जाणे, अचानक डोक्यात खूप दुखायला लागणे उलटी चक्कर आणि बेशुद्ध होण्याची शक्यता निर्माण होणे, आदी चिन्हे दिसतात.

स्ट्रोकची संभाव्य कारणे कोणते असतात?

डायबिटीज, उच्च रक्तदाब, स्थूलपणा, मानसिक ताण तणाव ही महत्वाचे कारणे ब्रेनस्ट्रोकमध्ये असतात.

स्ट्रोकची लक्षणे काय?

अशक्तपणा किंवा एका बाजूची ताकद जाणे.संवेदनांमध्ये बदल होतो . अंग जड पडणे , सुन्नपणा येणे.तोल सांभाळता न येण, स्नायूंचा कडकपणा आणि चालताना तोल जाणे ही लक्षणे दिसतात.

स्ट्रोकमध्ये फिजिओथेरपीची भूमिका काय?

स्ट्रोकनंतर फिजिओथेरपीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे स्नायूंचा कडकपणा कमी करणे, स्ट्रोक नंतर स्नायू हे कडक झालेले असतात त्याला आपण फिजिओथेरपीच्या व्यायामाने कडकपणा कमी करून पूर्वत करू शकतो.फजिओथेरपीच्या साहाय्याने आपण तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत ताकद वाढवून आपली कामे पूर्ववत करू शकतो.शरीराचा तोल सांभाळणे स्ट्रोक नंतर रुग्णांचा तोल जातो फिजिओथेरपी मधील तोल सांभाळणार्‍या विविध व्यायामाच्या प्रकारानंतर रुग्ण पूर्णपणे स्वतःचा तोल सांभाळून व्यवस्थित चालू शकतो.स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये रुग्ण स्नायूंच्या असंतुलनामुळे व्यवस्थित चालू शकत नाही विशिष्ट स्नायूंच्या व्यायामानंतर रुग्ण व्यवस्थित तोल सांभाळून स्वतंत्र एकटा चालू शकतो या सर्व गोष्टींवर फिजिओथेरपी विशिष्ट लक्ष देते व रुग्णाला स्ट्रोक नंतरही चांगली दिनचर्या देण्यास मदत करते.

डॉ.कृष्णा शिंदे, असोसिएटेड प्रोफेसर, मविप्र, फिजोओथेरपी महाविद्यालय

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...